कोल्हापूर: दिवसभराच्या उकाड्यानंतर गुरुवारी रात्री वादळी वाऱ्यासह पावसान शहराला जोरदार तडाखा दिला. सम्राटनगर आणि उचगाव येथे वीज पडल्याच्या वार्तेने नागरिकांत एकच घबराट उडाली. सम्राटनगर आणि उचगाव येथील प्रियदर्शिनी कॉलनी या नागरी वस्तीत वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याच्या घटना घडल्याचे नागरिकांनी सांगितले. रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कानठळया बसविणाऱ्या मेघगर्जनेमुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली. काही भागात झाडांच्या फांद्या तुटल्या आहेत. सुदैवाने कोणत्याही प्रकारची हानी झाली नाही.

सुमारे पंधरा मिनिटाच्या पावसामुळे रस्ते जलमय झाले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर शहर परिसरातील विविध भागातील वीज पुरवठा काही वेळ खंडित झाला. यामुळे नागरिकांत आणखीच घबराट पसरली. जिल्ह्याच्या विविध भागातही जोरदार पाऊस झाला. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वादळी वाऱ्यासह पावसाने ग्रामीण भागाला तडाखा दिला. ठिकठिकाणी पाणी साचले. झाडाच्या फांद्या तुटल्या.

सम्राटनगर येथील मिठारी किराणा दुकान आहे. या दुकानाला लागून असलेल्या नारळाच्या झाडावर वीज पडल्याचे नागरिकांनी अग्निशमन दलाला कळविले. यामध्ये कसल्याही प्रकारची हानी झाली नाही. असाच प्रकार उचगाव येथील प्रियदर्शिनी कॉलनी येथेही वीज पडून नारळाच्या झाडाने पेट घेतल्याचे घटना घडली. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान, शहरात नऊ ते सव्वानऊच्या दरम्यान पाऊस पडला. जवळपास पंधरा मिनिटे पावसामुळे शहरातील रस्ते जलमय झाले. सखल भागात पाणी साचले. पावसाला सुरुवात झाल्यानंतर काही वेळ वीज पुरवठा खंडीत झाला होता. दिवसभराच्या उकाड्यानंतर रात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here