मुंबई : लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे हिच्याबरोबर विमानात एक धक्कादायक प्रसंग घडला. विमानातल्या कर्मचाऱ्यानं पूजाशी गौरवर्तणूक केली. तिला धमकीही दिली. तिनं सगळं सोशल मीडियावर शेअर केलं. इंडिगोला तिची माफी मागावी लागली. मुंबई फ्लाइटमध्ये पूजा प्रवास करत असताना, हे घडलं.

Video- आता ‘दौलतराव’बद्दल थेट बोलली सई ताम्हणकर

पूजा हेगडेनं पूर्ण माहिती सोशल मीडियावर दिली आहे. तिनं ट्वीट केलं. ती लिहिते, ‘मला खूपच दु:ख होतंय की इंडिगोचा कर्मचारी विपुल नकशेनं मुंबई फ्लाइटमध्ये माझ्याशी वाईट वर्तणूक केली. कारण नसताना तो उद्धट वागला. मला धमकी दिली. मी अशा प्रकारचे ट्वीट करत नाही. पण हे वास्तव भयानक आहे.’

इंडिगोनं मागितली माफी

अभिनेत्रीच्या या ट्वीटनं इंडिगो विमान कंपनीनं लगेच अॅक्शन घेतली. माफी मागत त्यांनी खेद व्यक्त केला आणि डिटेल्स शेअर करण्याची विनंती केली. म्हणजे पूर्ण घटनेची ते माहिती घेऊ शकतील.

पूजा हेगडेच्या या ट्वीटवर लोकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. इंडिगो स्टाफ मेंबर विपुल संबंधित जुन्या ट्वीटलाही काहींनी शेअर केलं आहे. पूर्वीही तो अशीच गैरवर्तणूक करत असे, असं सांगितलं. लोक वैतागले होते. पण काही म्हणालेत, पूजानं असं ट्वीट करायला नको होतं. त्याची नोकरी जाऊ शकते.

नयनताराचं ड्रीम वेडिंग! ‘My Wife’ म्हणत विग्नेशने शेअर केले लग्नाचे Photos

पूजा दिसणार या सिनेमात

पूजा हेगडे

पूजा हेगडेनं नुकताच कान्समध्ये आपला जलवा दाखवला होता. पूजा हेगडे प्रभासच्या राधे श्याम आणि विजयसोबत बीस्ट सिनेमात होती. पण हे सिनेमे फारसे चालले नाहीत. ती बाॅलिवूड सिनेमेही करणार आहे. रणवीर सिंगबरोबर सर्कस आणि सलमान खानच्या कभी ईद कभी दिवाली सिनेमात ती आहे. तसंच तिला जन गण मन सिनेमाही मिळाला आहे.

खासगी आयुष्याबद्दल मी कधीच काही लपवलं नाही, ‘दौलतराव’बद्दल खास फिलिंग

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here