बुलढाणा : दरवर्षी शेतकऱ्यांकडून उधार शेतमाल घेऊन त्यांना घरपोच पैसे देऊन त्यांचा विश्वास संपादन करणाऱ्या संतोष रनमोडे याने शेतकऱ्यांना चांगलाच चुना लावला आहे. वाढीव रुपयांचे आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून कोट्यवधी रुपयांचा सोयाबीन माल खरेदी करुन शेतकऱ्यांच्या हातावर तुरी दिल्या आहेत. यामुळे मात्र ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकरी हवालदिल झाले आहेत. 

तुमच्या सोयाबीनला जादा भाव देतो अस भासवून खेडा पद्धतीने म्हणजेच उधारीत शेतकऱ्याचा सोयाबीन खरेदी करुन ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पैसे न देता शेतमालासह व्यापारी फरार झाला. दरवर्षीप्रमाणे यंदा शेतकऱ्यांना दिलेली मुदत संपूनही घरपोच रक्कम पोहोचती केली नाही. त्यातच त्याचा मोबाईल देखील लागत नसल्याने संशय आल्यानंतर शेतकऱ्यांनी त्याच्या गोडाऊनवर धाव घेतली. त्यावेळी हा व्यापारी फरार झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. बुलढाणा जिल्ह्यात या फसवणुकीची व्याप्ती चिखली, सिंदखेडराजा, मेहकर तालुक्यात असल्याने 500 हून अधिक शेतकऱ्यांन याचा फटका बसला आहे. आतापर्यंत जवळपास 95 शेतकऱ्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु पोलिसांनी या व्यापाऱ्याविरुद्ध अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.

ऐन पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांना असं गंडवण्यात आलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पुढील हंगामातील बी बियाण्यांसाठी इतरांपुढे आणि सावकारापुढे आत पसरावा लागत आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून शेतकऱ्यांकडून सोयाबीन माल खरेदी करुन  नंतर त्यांना पैसे देणाऱ्या भामट्याने त्यांचा विश्वास संपादन केला. दरवर्षीचा व्यवहार असल्याने शेतकऱ्यांनी देखील मुक्तहस्ताने या व्यापाराला आपला माल विकला. नंतर मात्र संतोष रानमोडे याने दिलेले चेक बाऊन्स झाले. तर आज देतो, उद्या देतो असं व्यापाऱ्याने सांगितल्याने शेतकरी एमआयडीसीमध्ये असलेल्या गोडाऊनमध्ये गेले. तर त्या ठिकाणी काहीच माल नव्हता तर संतोष रनमोडे मोबाईल फोनही उचलत नाही तर काही वेळाने मोबाईलही नॉटरीचेबल झाल्याने शेतकरी आता पेरणीपूर्वीच अडचणीत आले आहेत. विशेष म्हणजे काहींनी तर 50 लाखांचं सोयाबीन दिल्याचीही माहिती आहे. एकंदरीत ज्यांनी शेतीमाल दिला आहे ते हवालदिल होऊन संतोष रनमोडेची गोडाऊन समोर वाट पाहत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here