मुंबई : करण जोहर (Karan Johar) त्याच्या आगामी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ (Rocky Aur Rani Ki Prem Kahani) सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी सज्ज झाला आहे. या सिनेमात प्रमुख भूमिकेत रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि आलिया भट्ट (Alia Bhatt) असणार आहेत. आता या सिनेमाशी संबंधित एक ताजी बातमी समोर आली आहे. ती म्हणजे या सिनेमात एक दोन नाही तर तीन स्टारकिड्स आणि आताच्या आघाडीच्या अभिनेत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहेत.

असं काय झालं की, हिमाचलला गेलेल्या प्राजक्ताला महाराष्ट्रात पळून यावंसं वाटतंय; पोस्ट व्हायरल

मीडिया रिपोर्टनुसार करणचं दिग्दर्शन असलेल्या ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या सिनेमात सारा अली खान (Sara Ali Khan), जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) आणि अनन्या पांडे (Ananya Pandey) या तिघीजणी पाहुण्या कलाकार म्हणून दिसणार आहेत. इतकेच नाही तर या तिघी एक डान्सही करणार असल्याचं म्हटलं जात आहे. पण याबद्दल अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

रॉकी और रानी

सिनेमातील कलाकार

करण सध्या या सिनेमाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. सिनेमाचं चित्रीकरण यावर्षी सप्टेंबरमध्ये संपण्याचा अंदाज आहे. त्यानंतर या सिनेमाच्या पोस्ट प्रॉडक्शनच्या कामाला सुरुवात होईल. हा सिनेमा १० फेब्रुवारी २०२३ मध्ये रिलीज होणार आहे. सिनेमात आलिया भट्ट आणि रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. त्याशिवाय धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यादेखील मत्त्वाच्या भूमिका आहेत. सैफ अली खानचा मुलगा इब्राहिम अली खान या सिनेमासाठी करणचा असिस्टंट म्हणून काम करत आहे.

आता सलमान खानला मिळालेल्या धमकी मागचं सत्य उलगडणार?

करण करणार अॅक्शन सिनेमा

करण जोहरनं त्याच्या ५० व्या वाढदिवशी सांगितलं की, लवकरच तो अॅक्शन सिनेमा करणार आहे. त्यामुळे या सिनेमाबाबत सगळ्यांना उत्सुकता निर्माण झाली आहे. दरम्यान, करणनं त्याच्या ५० व्या वाढदिवसानिमित्त ठेवलेल्या पार्टीमध्ये मनोरंजन विश्वातील अनेक कलाकार सहभागी झाले होते. त्यातील अनेकांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं.

अॅसिड हल्ला पिडीत मुलीच्या भूमिकेत दिसणार रिंकू राजगुरु

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here