जिल्ह्यामध्ये ‘करोना’ रुग्णांच्या शोधाबरोबरच आता ‘सारी’ रुग्णांचेही तत्काळ निदान व्हावे, यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. ‘सारी’ व ‘करोना’ची लक्षणे ही जवळपास सारखीच आहेत. त्यामुळेच ‘सारी’चा रुग्ण ‘करोना’चा आहे का, हे तपासण्यासाठी ‘सारी’च्या रुग्णांचे स्वॅब घेतले जात आहेत. ‘करोना’चे संक्रमण थांबविण्यासाठी ‘सारी’च्या रुग्णांवरही बारीक लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २७ करोनाबाधीत रुग्ण आढळले आहेत. करोना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १ हजार २१५ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १ हजार १४५ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटिव्ह आले आहेत. काल पाठवलेले १३ आणि आज पाठविण्यात आलेले २० असे ३३ स्त्राव अहवालाची अद्याप प्रतीक्षा आहे. ज्या अहवालाची प्रतीक्षा आहे त्यामध्ये १४ दिवस पूर्ण केलेल्या आणखी दोघा परदेशी नागरिकांचा समावेश आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times