Vegetable Prices in Hingoli : सध्या भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांना अच्छे दिन आले आहेत. कारण सध्या भाजीपाल्यांच्या दरात मोठी वाढ झाली आहे. याचा शेतकऱ्यांना चांगला फायदा होत असल्याचे चित्र दिसत आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये देखील भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळं भाजपाल्यांच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. हिंगोलीच्या बाजारपेठेत अनेक भाज्यांनी शंभरी पार केली आहे. कोबी, मिरची, शेवगा या पिकांना सध्या चांगला दर मिळत असल्याचे चित्र दिसत आहे. 

हिंगोलीच्या बाजारपेठेमध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. दरवर्षी शेतकऱ्यांच्या  शेतातील भाजीपाल्याला भाव मिळत नसल्यानं दरवर्षी बळीराजाला मोठ्या संकटाचा सामना करावा लागत होता. परंतू यावर्षी भाजीपाल्याला भाव असल्यानं भाजीपाला उत्पादक शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. हिंगोली शहरासह तालुक्याला लागणाऱ्या भाजीपाल्याच्या तुलनेत आवक घटल्यानं भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले आहेत. कोबी मिरची शेवगा या फळभाज्यांनी शंभरी पार केली आहे. तर टोमॅटो आणि दोडके प्रतिकीलो 80 रुपये प्रमाणे विक्री केले जात आहेत. या पिकांचंउत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना अच्छे दीन आले आहेत.

भाजीपाल्यांच्या किंमतीत वाढ झाल्यामुलं शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, दुसरीकजे ग्राहकांच्या खिशाला चटका बसत आहे. सध्या अनेक ठिकाणी शेतकऱ्यांकडे भाजीपाला विक्रीसाठी शिल्लक नाही. त्यामुळं बाजारपेठेत आवक कमी आहे. तापमानवाढीचा, पिकावर पडणाऱ्या रोगांचा मोठा परिणाम झाला आहे. त्यामुळं अनेक शेतकऱ्यांना भाजपाला पिकाचे उत्पादन घेतलं नाही, तर काही शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटाचा फटका बसला आहे. त्यामुळं भाजीपाल्याचं उत्पादन कमी झालं आहे. परिणामी पिंकाच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे. तसेच दुसरीकडे उन्हाळ्यात पाण्याची देखील मोठी चंटाई असते, त्यामुळं देखील शेतकरी भाजीपाला पिकाचे उत्पादन कमी घेतात. 

दरम्यान, सध्या कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. कांद्यानं शेतकऱ्यांना रडवलं आहे. भाजीपाल्यांच्या दरात वाढ होत असली तरी कांद्याच्या दरात मात्र मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here