परभणी: पोहायला शिकण्यासाठी गेलेल्या युवकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जिल्ह्यात आणखी एक दुर्घटना घडली आहे. विजेच्या खांबावर दुरुस्तीचे काम करण्यासाठी गेलेल्या मजुराचा तारांमध्ये अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने शॉक लागून मृत्यू झाला. ही घटना परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील माखणी येथे ८ जून रोजी सकाळी ११ च्या सुमारास घडली आहे. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद झाली करण्यात आलेली नाही. स्वरूप बाळासाहेब शिसोदे (४२) असं मृत व्यक्तीचं नाव आहे.

माखणी येथील स्वरूप शिसोदे हे वीज दुरुस्तीचे काम करण्यासाठी गावापासून ३ किमी अंतरावर असलेल्या शेतामध्ये गेले होते. याचवेळी तारांमध्ये अचानक वीजप्रवाह सुरू झाल्याने त्यांना विजेचा धक्का बसला. यामध्ये शिसोदे यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे माखणी गावामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मतदान करताना घोळ, आव्हाड-यशोमती ठाकूर यांचं मत बाद करण्याची भाजपची मागणी, वाचा काय घडलं?

या प्रकरणी चौकशी करून अहवाल प्राप्त झाल्यास अधिक माहिती मिळेल, असं महावितरणकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच माखणी येथीलच एका तरुणाचा पोहायला शिकण्यासाठी गेल्यानंतर तलावामध्ये बुडून मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. त्यापाठोपाठ सदरील घटना घडली असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

तरूणीचा दुचाकी गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी थेट एटीएममध्ये

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here