मुंबई:अत्यंत नैसर्गिक आणि संवेदनशील अभिनय, मोहक रूप आणि निखळ हास्याची व्याख्या म्हणजे अभिनेत्री स्मिता पाटील. स्मिता पाटील यांची चित्रपट कारकीर्द जेवढी चर्चेत राहिली त्याहून जास्त चर्चा झाली ती त्यांच्या वैयक्तिक आयुष्याची. स्मिता यांच्या मैत्रिचे किस्सेही अनेक ऐकायला मिळतात. अमिताभ आणि स्मिता यांच्या मैत्रिचा असाच एक किस्सा सध्या चर्चेत आलाय.
कुली चित्रपटाचं शूटिंग सुरू असताना एका मध्यरात्री स्मिता यांचा अमिताभ यांना फोन आला होता. मध्यरात्री स्मिता यांचा फोन आल्यानं अमिताभ यांना आश्चर्य वाटलं , तसंच टेन्शनलही आलं होतं. स्मिता यांनी अमिताभ यांची विचारपूस करण्यासाठी कॉल केला होता.
स्मिता यांना अमिताभ यांचा अपघात झाल्याचं स्वप्न पडलं होतं. त्यामुळं त्यांनी काळजीपोटी अमिताभ यांना मध्यरात्रीच कॉल केला. स्मिता यांना वाटणारी भीती ऐकूण अमिताभही हैराण झाले होते. दुसऱ्या दिवशी अमिताभ नेहमीप्रमाणे शूटिंगला गेले, पण ज्याची भीती होती, ती घटना घडली आणि सेटवर अपघात झाला.