Rajyasabha Election 2022 | जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले नसल्याने आता दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ दुपारी ४ वाजता संपत आहे.

हायलाइट्स:
- दुपारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला
- जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या
- दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार
नवाब मलिक यांनी शुक्रवारी सकाळी त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्यांना याचिकेत दुरुस्ती करून योग्य त्या कोर्टात जाण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार दुपारी विशेष पीएमएलए कोर्टात त्यांचा अर्ज सुनावणीसाठी आला. पण जेवणाची वेळ झाल्यामुळे न्यायमूर्ती भारती डांगरे न्यायासनावरून उठून गेल्या. न्यायमूर्तींनी स्पष्टपणे सांगितले नसल्याने आता दुपारी २.३० वाजता पुन्हा तातडीची सुनावणी होण्यासाठी मलिक यांचे वकील विनंती करणार की नाही याबद्दल उत्सुकता आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर चित्र स्पष्ट होण्याची चिन्हे आहेत. राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ दुपारी ४ वाजता संपत आहे. त्यामुळे दुपारी २.३० नंतर सुनावणी होऊन नवाब मलिक यांना मतदानाला जाण्याची परवानगी मिळाली तरी कायदेशीर सोपस्कार पूर्ण करून ते मतदानासाठी वेळेत पोहोचतील का, याबाबत शंकाच आहे. त्यामुळे नवाब मलिक यांच्या राज्यसभा निवडणुकीत मतदान करण्याच्या आशा आता जवळपास मावळल्या आहेत.
एवढेच नव्हे तर विशेष पीएमएलए न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी नवाब मलिक यांच्या याचिकेबाबत आणखी एक आक्षेप उपस्थित केला आहे. विशेष पीएमएलए कोर्टाने जामीन अर्ज फेटाळला असेल तर तो आदेश रद्द करण्याची विनंती करणारी याचिका तुम्हाला करावी लागेल. पोलिस सुरक्षा व्यवस्थेत पाठवू देण्याच्या परवानगीचा आदेश देण्याचा प्रश्न उद्भवतो कुठे?”, असा प्रश्न न्यायमूर्ती भारती डांगरे यांनी नवाब मलिक यांच्या वकिलांना विचारला. त्यामुळे आता पुन्हा सुनावणी झाल्यास न्यायालायकडून हा मुद्दा उपस्थित होऊ शकतो.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp leader nawab malik plea in pmla court for rajyasabha election 2022 voting
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network