Rajya Sabha Election 2022: राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार चुरस आहे. मविआच्या दोन आमदारांची मतं अवैध ठरवण्याची मागणी भाजपनं केली होती. मात्र ही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळून लावली.

हायलाइट्स:
- राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान सुरू
- मविआच्या दोन आमदारांची मतं अवैध ठरवण्याची मागणी
- भाजपची मागणी निवडणूक अधिकाऱ्यांनी फेटाळली
नेमकं काय घडलं?
राज्यसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडी आणि भाजपचे पोलिंग एजंट मतदानाच्या ठिकाणी बसले आहेत. त्यांच्याकडून मतदानप्रक्रियेवर लक्ष ठेवले जात आहे. भाजपचे पोलिंग असलेल्या पराग अळवणी यांनी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांचे मत बाद ठरवण्याची मागणी केली आहे. राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपत्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. त्यामुळे या दोन्ही आमदारांची मतं बाद ठरवण्यात यावीत, अशी मागणी पराग अळवणी यांनी केली.
राज्यसभा निवडणुकीसाठी विधिमंडळात सकाळी ९ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. भाजप आणि महाविकास आघाडीच्या आमदारांकडून ठरलेल्या रणनीतीनुसार टप्याटप्प्यानं मतदान केलं जात आहे. दुपारी दोन वाजेपर्यंत बहुतांश आमदारांचं मतदान पूर्ण झालं आहे. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी मतदान केलं आहे. राष्ट्रवादीचे जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात आणि अपक्ष आमदार रवी राणा यांचं मतदान अद्याप शिल्लक आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून आपापल्या उमेदवारांसाठी राखून ठेवण्यात आलेला निर्धारित कोटा वाढवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठीची चुरस आणखी वाढण्याची शक्यता आहे.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : rajya sabha election 2022 election officer rejects bjp’s claims to declare jitendra awhad and yashomati thakurs vote invalid
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network