मिळालेल्या माहितीनुसार, हर्षलता गेडाम या सकाळी नेहमीप्रमाणे जॉगिंगसाठी विश्रामबागच्या नेमिनाथनगर येथील कल्पद्रुम क्रीडांगणावर गेल्या होत्या. जॉगिंग सुरू असताना मोटारसायकालवरून आलेल्या अज्ञात दोघांनी गेडाम यांच्या हाताला पडकलं. त्यानंतर अज्ञात इसमाला गेडाम यांनी लाथ मारून खाली पाडले. या झटापटीवेळी दुसऱ्या आरोपीने गेडाम यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांना किरकोळ जखम झाली आहे. हल्ला होताच मार्शल आर्ट असणाऱ्या गेडाम यांनी स्वतःचा बचाव करण्यासाठी प्रतिहल्ला केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळाहून पळ काढला.
दरम्यान, या दोन आरोपींपैकी एकाने १७ मे रोजी हर्षलता गेडाम यांचा पाठलाग करत छेडछाड करण्याचा प्रयत्न केला होता. तीच व्यक्ती पहाटेच्या सुमारास पुन्हा आली आणि त्याने गेडाम यांच्यावर हल्ला केला आहे. याबाबत उपजिल्हाधिकारी हर्षलता गेडाम यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत अज्ञातांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपजिल्हाधिकारी महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याच्या घटनेमुळे सांगलीत खळबळ उडाली आहे.