मुंबई : आपण नेहमीच ऐकत असतो, एखादा प्रेमी आपल्या प्रेयसीचं लग्न दुसऱ्या कुणाशी होत असेल तर अनेकदा लग्नमंडपात जाऊन लग्न थांबवण्याचा प्रयत्न करतो. अगदी अशीच फिल्मी गोष्ट घडली सेलिब्रिटींच्या आयुष्यात. अभिनेत्री आणि गायिका ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नात असंच काहीसं झालं. ब्रिटनी स्पीयर्सनं ९ जूनला सॅम असगरीबरोबर लग्न होतं. सर्व तयारी झाली. ब्रिटनी होणाऱ्या पतीबरोबर लग्नाच्या ठिकाणी होती. इतक्यात तिचा आधीचा नवरा जेसन अॅलेक्झांडर तिथे आला आणि त्यानं मोठा हंगामा केला.

यानं आम्ही जनावरं बांधतो…उर्फीनं बिकीनीवर घातला जाड दोऱ्यांचा ड्रेस, नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

ब्रिटनीच्या लग्नात जेसनची एंट्री
ब्रिटनी स्पीयर्सच्या लग्नाआधी थोडे तास जेसन तिच्या घरी आला होता. त्यानं इन्स्टाग्राम अकाउंटवरून लाइव्ह करून सांगितलं की मी लग्नाच्या ठिकाणी जातोय. तिथे गेल्यावर सुरक्षा रक्षकांनी त्याला अडवलं. तेव्हा खूप हंगामा करून तो लग्नाच्या हाॅलमध्ये शिरला.

ब्रिटनी,सॅम आणि जेसन

५५ तास टिकलं होतं ब्रिटनी-जेसनचं लग्न
रिपोर्टनुसार Jason Alexander आणि सुरक्षा रक्षकांत झटापट झाली. जेसन मला लग्नाला बोलावलंय, असं ओरडू लागला. जेसन आणि ब्रिटनीचं लग्न २००४मध्ये झालं. ते फक्त ५५ तास टिकलं. जेसननंतर ब्रिटनीनं त्याच वर्षीKevin Federline बरोबर लग्न केलं. पण २००७मध्ये ते विभक्त झाले.

ब्रिटनी आणि सॅम

ब्रिटनी आणि सॅम ६ वर्ष करतायत डेट
ब्रिटनी स्पीयर्स गेली ६ वर्ष सॅमला डेट करत आहे. ९ जूनला दोघांचं लग्न होतं. तिथं जेसननं तमाशा केला आणि मग पोलिसांनी त्याला अटक केली. ब्रिटनी आणि सॅम असगरी यांचा सप्टेंबर २०२१ रोजी साखरपुडाही झाला. ती माहिती त्यांनी सोशल मीडियावर दिली होती.

बांगड्या अन् टिकली प्रियांकाचा Bikini Photo पाहून निक हैराण

अल्ट्रा ग्लॅमरस ड्रेसमुळे उर्फीनं वेधलं लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here