Chandrakant Patil birthday | राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही. तर हिमालयात जाईल असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी विधान केले होते. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणुक चंद्रकांत दादा लढले नाही. पण तिथे भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते.

हायलाइट्स:
- राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन
- कोल्हापूर येथील पोटनिवडणुक चंद्रकांत दादा लढले नाही
- तिथे भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले
या वक्तव्याची आठवण करून देत त्यांना हिमालयात पाठवण्यासाठी महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून जमा करण्यात आलेला निधी हा कुरियरच्या माध्यमातून चंद्रकांत पाटील यांना पाठवण्यात आलेला आहे. राज्यात महिला असो किंवा समाज यांच्याविषयी नेहमी बेताल वक्तव्य करणाऱ्या चंद्रकांत पाटील यांना हिमालयात जाण्याची गरज आहे, आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याची व्यवस्था महाविकासआघाडी कडून करण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी दिलेली आहे.
राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष कोथरूडचे आमदार चंद्रकात पाटील यांनी विधान केले होते. मात्र कोल्हापूर येथील पोटनिवडणुक चंद्रकांत दादा लढले नाही. पण तिथे भाजपच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाही. तसेच त्याच दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी चुलीत जा, मसणात जा, अशा पद्धतीने विधान केले. त्यामुळे राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत दादांच्या वाढदिवशी हिमालयात जाण्यासाठी गोळा केलेला गोळा निधी आणि तेलाची बाटली,साबण,ब्रश, कोलगेट कुरिअरने पाठवत आहोत, असे रुपाली पाटील यांनी सांगितले.
चंद्रकांत दादांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे आणि ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि डोक्याला निश्चित शांती मिळेल, तसेच त्यांच्या संस्कारांमध्ये देखील वाढ होईल. त्यामुळे दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे, अशी आमची इच्छा असल्याचे रुपाली पाटील यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : mahaviaks aghadi gift to bjp chandrakant patil on his birthday
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network