मुंबई : अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.

राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

मतदान करताना घोळ, आव्हाड-यशोमती ठाकूर यांचं मत बाद करण्याची भाजपची मागणी, वाचा काय घडलं?
भाजपच्या पत्रानंतर राज्यसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाची एन्ट्री झाली आहे, आयोगाने मंत्री जितेंद्र आव्हाड, मंत्री यशोमती ठाकूर आणि शिवसेना आमदार सुहास कांदे मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत. हे तिन्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोग याप्रकरणी निर्णय देणार आहे.

महाविकास आघाडीला दिलासा! आव्हाड, ठाकूर यांची मतं वैधच; भाजपचे आक्षेप फेटाळले
राज्यसभा निवडणुकीच्या अटीतटीच्या लढाईत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यासाठी प्रत्येक मत महत्त्वाचे आहे. या निवडणुकीतील महाविकास आघाडीची एकत्र ताकद आणि त्यांना असलेल्या अपक्ष आमदारांचा पाठिंबा पाहता सत्ताधाऱ्यांचे पारडे जड मानले जात आहे. त्यामुळे भाजप महाविकास आघाडीचे एखाद्या आमदाराला गळाला लावण्याचा किंवा एखादे मत कमी कसे होईल, यासाठी प्रयत्नशील आहे. याचेच प्रत्यंतर शुक्रवारी विधानभवनात आले. सकाळी नऊ वाजल्यापासून याठिकाणी राज्यसभा निवडणुकीच्या मतदानाला सुरुवात झाली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांचे मत बाद ठरवले जावे, अशी मागणी भाजपने केली आहे. मविआच्या जितेंद्र आव्हाड, यशोमती ठाकूर आणि सुहास कांदे यांनी मतदान करताना जरासा घोळ केल्याने त्यांची मतं बाद करण्याची मागणी भाजप आमदार पराग अळवणी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here