मध्य प्रदेशात इंदूर हे करोनाचा हॉटस्पॉट बनले आहे. राज्यातील करोना रुग्णांची संख्या ही ९३८ इतकी झाली आहे. तर आतापर्यंत ५३ जणांचा करोनाने मृत्यू झाला आहे. मध्ये प्रदेशातल्या ५२ पैकी २६ जिल्ह्यांमध्ये करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत.
मध्य प्रदेश आरोग्य विभागाच्या माहितीनुसार करोनाचे सर्वाधिक रुग्ण हे इंदूरमध्ये आहेत. इंदूरमध्ये ५४४ जणांना करोनाची लागण झाली आहे. तर भोपाळमध्ये १६७ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. खरगोन जिल्ह्यातील रुग्णांची संख्या वाढून ३९ वर गेली आहे. राज्यात करोनाने मृत्यू झालेल्या ५३ जणांपैकी ३७ जण इंदूरचे होते. उज्जैन ६, भोपाळ ५, खरगोन ३ आणि छिंदवाडा, देवासमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
इंदूरमध्ये ५४४, भोपाळ १६७, खरगोन ३९, उज्जैन ३०, बडवानी २२, होशंगाबाद १६, खंडवा १६, देवास १५, मुरैना १४, विदिशा १३, रतलाम १२ आणि जबलपूरमध्ये १२ रुग्ण आढळून आले आहेत, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिलीय. तर ६४ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times