rajya sabha election 2022: मविआच्या तीन आमदारांची मतं रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे. तसं पत्रच त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगानं लिहिलं आहे. काँग्रेस, राष्ट्रवादीच्या उमेदवारांचं प्रत्येकी एक मत रद्द झालं तरीही त्यांचे उमेदवार विजयी होतील.

 

sharad pawar
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार

हायलाइट्स:

  • राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी चुरस
  • भाजपनं आक्षेप घेतल्यानं मतमोजणी रखडली
  • मविआची तीन मतं रद्द करा; भाजपची मागणी
मुंबई: अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.

राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड, शिवसेनेचे सुहास कांदे आणि काँग्रेसच्या यशोमती ठाकूर यांच्या मतावर भाजपनं आक्षेप घेतला आहे. त्यांची मतं रद्द करण्याची मागणी भाजपनं केली आहे. आव्हाड, कांदे आणि ठाकूर तीन वेगवेगळ्या पक्षांचे आमदार आहेत. त्यामुळे त्या तिघांचं मतदान वेगवेगळ्या पक्षाला असू शकतं. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या उमेगवारांना फारसा फरक पडणार नाही.
गेहलोतांंचं परफेक्ट नियोजन, काँग्रेसची सरशी, ३ जागांवर गुलाल, सुभाष चंद्रांना पराभवाचा धक्का
काँग्रेस, राष्ट्रवादीनं आपल्या उमेदवारांसाठी मतांचा कोटा वाढवला होता. राज्यसभा निवडणुकीत अनेकदा मतं बाद होतात, काहीवेळा ती अवैध ठरतात. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी काँग्रेस, राष्ट्रवादीच्या आमदारांचा कोटा ४२ वरून ४४ केला होता. त्यामुळे एखादं मत बाद झाल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीला फरक पडणार नाही. आव्हाड, ठाकूर यांती मतं झाली तरीही काँग्रेसचे इम्रान प्रतापगढी आणि राष्ट्रवादीचे प्रफुल्ल पटेल विजयी होतील.
तोच खेळ पुन्हा रंगणार, २०१७ ची पुनरावृत्ती? राज्यसभा निवडणुकीत काय घडलं होतं?
शिवसेनेचे पहिले उमेदवार संजय राऊतदेखील सहज विजयी होतील. मात्र खरी लढाई सेनेचे उमेदवार संजय पवार वि. भाजपचे धनंजय महाडिक यांच्यामध्ये आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय वि. धनंजय असा संघर्ष आहे. संजय पवार यांना अनेक अपक्षांनी मतदान केल्याचं समजतं. यासोबतच त्यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची संख्यादेखील जास्त आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : rajya sabha election 2022 congress and ncp candidate will win even if two votes cancelled
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here