मुंबई : अपक्ष आमदार रवी राणा यांनी मतदान केल्यानंतर हनुमान चालिसा दाखवल्याने त्यांचं मत रद्द करण्यात यावं, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. रवी राणा यांनी धार्मिक मुद्दा हातात घेऊन इतर मतदारांना प्रभावित केलं, अशा प्रकारचा आक्षेप सेनेने घेतला आहे. सेनेच्या आक्षेपावर खासदार नवनीत राणा यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “उद्धव ठाकरे घाबरले आहेत. त्यामुळे अशा प्रकारचे आक्षेप सेना घेत आहे. तुम्ही म्हणाल तोच नियम काय, आमची जर देवावर श्रद्धा असेल तर तुम्हाला काय फरक पडतोय? पराभव दिसताच शिवसेना घाबरायला लागली आहे”, अशी जोरदार टीका खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीनेही भाजपच्या दोन मतांवर आक्षेप नोंदवला आहे. रवी राणा आणि सुधीर मुनगंटीवार यांनी नियमानुसार मतदान केलं नाही. रवी राणांनी मतदानानंतर हनुमान चालिसा दाखवली तर मुनगंटीवारांनी आपली पतपत्रिका पोलिंग एजंटच्या हातात दिली, असा आक्षेप सेनेने घेतला आहे.

रवी राणांनी हनुमान चालिसा दाखवली, मुनगंटीवारांकडूनही चूक, शिवसेना केंद्रीय निवडणूक आयोगाकडे!
“सेनेच्या आक्षेपानंतर खासदार नवनीत राणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “आम्ही जी लढाई लढतो आहोत, त्यात आम्हाला यश मिळू दे, अशी आम्ही देवाकडे प्रार्थना करतो. सेनेला आमच्या श्रद्धेवर आक्षेप का आहे? देवाचं नाव घेणं चूक आहे का? जेव्हापासून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हापासून त्यांची मनमानी सुरु आहे. ते जे सांगतील तोच नियम काय? महाराष्ट्राच्या जनतेने अशा प्रकारचं चित्र कधीही पाहिलं नव्हतं”, अशी टीका नवनीत राणा यांनी केली आहे.

भाजपचा मविआच्या ३ मतांवर आक्षेप

राज्यसभा निवडणुकीची मतपत्रिका भरल्यानंतर संबंधित आमदाराने आपल्या गटाच्या नेमून दिलेल्या प्रतिनिधीला आपली मतपत्रिका दाखवणे आवश्यक आहे. जितेंद्र आव्हाड यांनी आपली मतपात्रिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दाखवण्याऐवजी ती त्यांच्या हातात दिली. तर यशोमती ठाकूर यांनीही आपली मतपत्रिका नाना पटोले यांच्या हातात दिली. शिवसेना आमदार सुहास कांदेंनी देखील तीच चूक केली. त्यामुळे मविआच्या तीनही आमदारांचं मत बाद केलं जावं, अशी मागणी भाजपने केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे.

गेहलोतांंचं परफेक्ट नियोजन, काँग्रेसची सरशी, ३ जागांवर गुलाल, सुभाष चंद्रांना पराभवाचा धक्का
आक्षेपांच्या राड्यात मतमोजणी थांबवली

अगदी उमेदवारी जाहीर होण्यापासून रंजक घडामोडींनी गाजलेल्या राज्यसभा निवडणुकीत मतदान संपल्यानंतरही नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. महाविकास आघाडीच्या तीन मतांवर भाजपने आक्षेप घेत ही मतं बाद केली जावीत, अशी मागणी केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र लिहून केली आहे. त्यामुळे सायंकाळी ५ वाजता सुरु होणारी मतमोजणी अद्यापही सुरु झालेली नाही. गेली २ तास ही मतमोजणी रखडली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने जितेंद्र आव्हाड, सुहास कांदे आणि यशोमती ठाकूर मतदान करतानाचे व्हिडिओ मागवून घेतले आहेत.

101 वेळा हनुमान चालीसा पठण करून आलोय; भाजपचं येणार | रवी राणा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here