Rajyasabha Election 2022 | राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी (Mahaviaks Aghadi) सरकारवर टीकास्त्र सोडले.

हायलाइट्स:
- भाजपचा तिसरा उमेदवार निवडून आला
- महाडिकांनी शिवसेनेच्या पहिल्या उमदेवारापेक्षा म्हणजे संजय राऊत यांच्यापेक्षा जास्त मतं घेतली
- राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला
राज्यसभा निवडणुकीचा निकाल शनिवारी पहाटे चार वाजता जाहीर झाला. देवेंद्र फडणवीस राज्यसभा निवडणुकीचं मतदान सुरु असताना काल दिवसभरात एकही प्रतिक्रिया दिली नव्हती. मात्र, आज पहाटे निकाल जाहीर झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस विधिमंडळाच्या परिसरात प्रसारमाध्यमांना सामोरे गेले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. महाराष्ट्रातील जनतेने २०१९ साली भाजपला जनमत दिले होते. मात्र, आमच्या पाठीत सुरा खुपसून महाविकास आघाडीने ते काढून घेतले. मात्र, अशाप्रकारे स्थापन झालेले सरकार किती अंतर्विरोधाने भरलेले असू शकते, हे आजच्या विजयाने स्पष्ट झाल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
जे स्वत:लाच महाराष्ट्र समजतात, जे स्वत:लाच मुंबई समजतात, जे स्वत:लाच मराठी समजतात, त्या सगळ्यांना या विजयाने लक्षात आणू दिले आहे की, ते म्हणजे महाराष्ट्र नाहीत, ते म्हणजे मुंबई नाहीत. महाराष्ट्र म्हणजे राज्यातील १२ कोटी जनता आहे. भाजपला मिळालेला आजचा विजय हा आमच्यासाठी आनंदाचा क्षण आहे. भाजपचे तिन्ही उमेदवार निवडून आले. मी हा विजय आमचे लढवय्ये नेते मुक्ता टिकळ आणि लक्ष्मण जगताप यांना समर्पित करतो. आमचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही ही निवडणूक लढवली होती. हा विजय म्हणजे त्यांच्या वाढदिवसाचे गिफ्ट आहे. आम्ही त्यांना भेट म्हणून कोल्हापूरचा पैलवान दिला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : devendra fadnavis slams shivsena sanjay raut after victory in rajyasabha election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network