मुंबई : सगळ्यांनाच प्रतीक्षा असलेल्या मान्सूनने दक्षिण कोकणात जोरदार हजेरी लावली. गोव्यासह कोकणातल्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. इतकंच नाही तर यामुळे राज्यातल्या काही जिल्ह्यांना मान्सूनपूर्व पावसाने झोडपलं. मुंबई, पुणे, सातारा, रायगड, रत्नागिरी, सांगली या जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पाऊस झाला.

दरम्यान, मान्सूनची वाटचाल योग्य दिशेने होत असल्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. इतकंच नाही तर पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाची शक्यता असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.

गुड न्यूज! सोमवार पावसाचा?, मान्सून पुढील दोन दिवसांत मुंबईत दाखल होण्याचा अंदाज
हवामान खात्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोकणातील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, आणि मध्य महाराष्ट्रातील नंदूरबार, जळगाव, नाशिक, नगर, पुणे, सातारा, सांगली, धुळे तर मराठवाडा विभागातील जालना, बीड, परभणी, औरंगाबाद, नांदेड या जिल्ह्यात तर विदर्भातील बुलढाणा, वाशीम, अमरावती, यवतमाळ, अकोला, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे.

खरंतर, मान्सून तळकोकणात दाखल झाला आहे. त्यामुळे राज्याच्या अनेक भागांमध्ये पूर्वमोसमी पावसाने हजेरी लावली. दक्षिण कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आजपासून जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अशात राज्यात पुढचे दोन दिवस मेघगर्जनेसह, विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस होईल अशी माहिती हवामान विभागाने दिली. त्यामुळे या जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला असून पावसाचा अंदाज घेत घराबाहेर पडा अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत.

मुंबईत कधी येणार मान्सून?

मान्सून दक्षिण कोकणात वेंगुर्ल्यापर्यंत पोहोचला, तर महाराष्ट्राच्या दक्षिण भागामध्ये मान्सून पोहोचण्यासाठी पुढील दोन दिवस लागू शकतात आणि त्यापुढील दोन दिवसांमध्ये राज्यातील आणखी काही भागांमध्ये मान्सून पोहोचेल, असे भारतीय हवामान विभागाने सांगितले आहे. सर्वसाधारणपणे १० जूनला मुंबईमध्ये मान्सून दाखल होतो. स्कायमेट या खासगी संस्थेने मुंबईमध्ये पुढच्या आठवड्यात मान्सून सक्रिय होऊ शकतो, असा अंदाज वर्तवला आहे.

Monsoon Arrival 2022 : पुढच्या ४८ तासांत महाराष्ट्रात बरसणार मान्सून?, IMD कडून आनंदाची बातमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here