मुंबई : साऊथची लोकप्रिय अभिनेत्री नयनतारा आणि विग्नेश शिवन गेले ६ वर्ष डेटिंग करत होते. आता ९ जूनला दोघांनी रिती-रिवाजाप्रमाणे लग्न केलं. त्यांचे लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. लग्नाला शाहरुख खानही गेला होता. शाहरुखच्या जवान सिनेमात नयनतारा आहे. सप्तपदीनंतर नवविवाहित जोडपं तिरुपती बालाजीच्या दर्शनाला गेले होते.

जंगलात जाणं आलं रणवीरच्या अंगाशी, मागे लागलं भलंमोठं अस्वल अन्…. पाहा Video

नयनताराच्या लग्नात कुटुंबातले नातेवाइक, जवळचे फ्रेंड्स आणि इंडस्ट्रीमधले लोकप्रिय हस्ती सामील झाले होते. शाहरुख खानसोबत रजनीकांतनंही समारंभाची शोभा वाढवली. लग्नात लाल रंगाच्या साडीत नयनतारा सुंदर दिसत होती. लोकांच्या नजरा तिच्यावरून हटत नव्हत्या. त्यानंतर हिरव्या रंगाचा काठ असलेली पिवळ्या रंगाच्या कांजिवरम साडीत ती पतीसोबत दिसली.

नयनतारा विग्नेश

पारंपरिक लूकमध्ये नयनतारा
तिरुपतीमध्ये भगवान व्यंकटेशचं दर्शन करायला दाम्पत्य पोहोचलं. नयनताराचं गोड स्मित पाहून फॅन्स वेडेच व्हायचे बाकी होते. विग्नेशही पांढरा शर्ट आणि साऊथ इंडियन स्टाइल धोतर घालून होता. त्यानं पारंपरिक सोन्याचा दागिनाही घातला होता. दोघांना हातात हात घालून देवदर्शन करताना पाहून चाहते खूश झाले.

नयनतारा विग्नेश तिरुपतीला

साखरपुड्यानंतर दोघांनी केलं लग्न
नयनतारा आणि विघ्नेश यांची विजय सेतूपतीच्या ‘नानूम रावडी धान’ (Naanum Rowdy Dhaan) या सिनेमाच्या सेटवर भेट झाली होती. तेव्हापासूनच एकमेकांनी डेट करण्यास सुरुवात केली होती. २०२१ ला साखरपुडा झाला आणि आता लग्न. त्यांच्या लग्नासाठी शाहरुख खान, रजनीकांत, बोनी कपूर, विजय सेतूपती, अभिनेता कार्ती, एसजे सूर्या या कलाकारांची उपस्थिती होती.

४ हात आणि ४ पाय असलेल्या चिमुकलीला सोनू सूदची मदत, शस्त्रक्रियेनंतर अशी दिसतेय चौमुखी

लग्नाच्या दिवशी नयनताराने टोन-ऑन-टोन एम्ब्रॉयडरी असलेली साडी नेसली होती. अभिनेत्रीच्या आवड लक्षात घेऊन या साडीची डिझाइन करण्यात आली होती. या संपूर्ण साडीवर ‘होयसाळ’ या मंदिरांची संपूर्ण नक्षी कोरण्यात आली होती. या लेस ऍप्लिक-क्रिस्टल आणि सिक्विन वर्कसह सजवण्यात आले होतं. या सुंदर नक्षीदार साडीवर अभिनेत्रीने फुल-स्लीव्ह ब्लाउजसह परिधान केला होता. फुलनेक ब्लाउजमुळे या साडील वेगळाच लूक आला होता.

‘जीव माझा गुंतला’च्या सेटवर भजी पार्टी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here