मुंबई : अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाला. पावसाळा सुरू होताच मुंबईतील अनेक भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस झाला. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्येही मान्सूनने दणका दिला आहे.

महाराष्ट्रातील ठाणे, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील तुरळक ठिकाणी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वाऱ्याचा वेग आणि मेघगर्जनेसह पाऊस झाला, अशी हवामान खात्याने दिली आहे. इतकंच नाहीतर शनिवारी दुपारनंतर मुंबईत पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने म्हटले आहे.

Weather Alert : राज्यासाठी पुढचे २ दिवस महत्त्वाचे; ठाणे, पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना येलो अलर्ट

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज ११ जून रोजी डहाणू, मुंबई, ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पुण्यापर्यंत आणि कर्नाटक व काही भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे.

Mumbai Rains : मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस; कुठे पाणी तुंबले तर कुठे झाडं कोसळले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here