मुंबई : अखेर आज मान्सूनचे राज्यभर हजेरी लावल्याने बळीराजासह उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. नैऋत्य मान्सून आज मुंबईसह कोकणातील बहुतांश भाग आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागात पोहोचला आहे. आज मुंबईत मान्सूनला अधिकृत सुरुवात झाली.
गुरुवारपासून शनिवारी सकाळपर्यंत उपनगरात मुसळधार पाऊस झाला. शुक्रवारी सकाळी ८.३० वाजता IMD ने दिलेल्या अंदाजानुसार, सांताक्रूझ वेधशाळेत १५.५५ मिमी पावसाची नोंद झाली तर कुलाबात पाऊस झालाच नाही. पण वीकेंडसाठी, IMD ने शहरासाठी येलो इशारा जारी केला आहे, ज्यामध्ये विजांच्या कडकडाटासह वादळ आणि वादळी वाऱ्यांची शक्यता वर्तवण्यात आली आहे. Monsoon News 2022 : मुंबईत अखेर मान्सूनचं आगमन, हवामान खात्याकडून माहिती हवामान खात्याने शुक्रवारी दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागांत, संपूर्ण गोवा, कोकणातील काही भाग आणि कर्नाटकच्या काही भागात पुढे सरकला आहे. तर मुंबईवर मान्सूनची अधिकृत सुरुवात ११ जूनला झाली आहे.
शहरात नोंद झालेल्या पावसामुळे रात्रीचे तापमान ३० अंशांच्या जवळ पोहोचले होते. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार सांताक्रूझ वेधशाळेत शुक्रवारी किमान तापमान २५ अंश नोंदवले गेले तर कुलाबा येथील वेधशाळेत २६.७ अंश नोंदवले गेले.