मुख्तार हा येथील अर्जुन रावराणे उच्च महाविद्यालयात १२वी विज्ञान विभागात शिकत होता. तर मोमीना ही विवाहित असून तिला दोन महिन्यांची मुलगी आहे. मुख्तार हा बहिणीला घेऊन वैभववाडी येथे डॉक्टरकडे जात होता. त्यावेळी राजमार्गावर हा अपघात झाला. अपघातानंतर मिक्सर वाहन चालक गाडी सोडून पसार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या अपघाताने राज्य मार्गावरील वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोवा राज्यासह अन्य ठिकाणाहून पर्यटक मोठ्या प्रमाणात तिलारी नदी परिसरात आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र हा पर्यटनाचा आनंद लुटताना झालेला थोडासा हलगर्जीपणाही जीवावर बेतण्याचा धोका असतो. कुडासे वानोशी परिसरात असाच प्रकार घडला असून नदीत बुडून दोन जणांनी आपला जीव गमावला आहे. तनिषा ठाकूर (वय १३) आणि विजय पालयेकर (वय ४५) अशी मृतांची नावे आहेत.
नाचता येईना अंगण वाकडे, अशी शिवसेना आणि संजय राऊतांची अवस्था | चंद्रकांत पाटील