मालेगावातील आणखी काही रुग्णांचे करोना चाचणी अहवाल प्राप्त झाले असून त्यातील सात जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्याने चिंतेत भर पडली आहे. मालेगावातील आता एकूण करोनाबाधीत रुग्णांची संख्या ४७ इतकी झाली आहे. नाशिक जिल्ह्यात करोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ५५ वर गेली असून त्यात मालेगावात ४७, नाशिक शहरात ५ आणि जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील ३ जणांचा समावेश आहे.
दरम्यान, नाशिक जिल्ह्यात आज करोनाच्या एकूण ९ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. दुपारपर्यंत दोन वृद्धांना करोनाचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यात नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील ६३ वर्षीय महिलेचा तसेच मालेगाव येथील ६४ वर्षीय व्यक्तीचा समावेश होता. मालेगाव येथील वृद्धाला अॅन्जिओप्लास्टिसाठी सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. त्यात सायंकाळी आणखी सात रुग्णांची भर पडली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times