मुंबई : राज्यसभा निवडणुकीचा निकाल लागला असला तरी ज्या पद्धतीने तो निकाल लागलाय, यावरुन सध्या कोणत्या अपक्षाचं मत फुटलं, याची सर्वाधिक चर्चा आहे. तसेच याच विषयावरुन राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडतायत. अपक्षांनी धोका दिला म्हणूनच आमचा उमेदवार हरला, असं म्हणत यांनी काही फुटीर अपक्षांची नावं घेतली. यावेळी त्यांनी स्वाभिमानीचे आमदार असल्याचा उल्लेख केला. हकालपट्टी केलेल्या आमदाराचा उल्लेख स्वाभिमानीचा आमदार म्हणून केल्याने यांनी राऊतांवर नाराजी दर्शवली तसेच यानिमित्ताने आपल्या जुन्या सहकाऱ्यावर देखील शेट्टींनी निशाणा साधला.

राज्यसभा निवडणूक निकाल तसेच संजय राऊत यांनी अपक्ष आमदारांच्या फुटीच्या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी एक फेसबुक पोस्ट केली आहे. या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी संजय राऊत यांना एक विनंती केली आहे तर देवेंद्र भुयार यांच्यावर निशाणा साधला आहे.

“संजय राऊतजी ज्या आमदाराचा उल्लेख तुम्ही स्वाभिमानीचा म्हणून केलेला आहात त्याच्या बुडावर लाथ घालून पूर्वीच आम्ही त्याची हकालपट्टी केलेली आहे. तेव्हा कृपा करून स्वाभिमानीचा आमदार असा उल्लेख करू नका. तो असा का वागला या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवार आणि जयंत पाटील देतील”, असं राजू शेट्टी यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.

संजय राऊतांचा आरोप काय?
महाविकास आघाडीच्या गोटातील अपक्ष आमदारांची मतं फुटल्यामुळे शिवसेनेच्या संजय पवार यांच्यावर पराभवाची नामुष्की ओढावली. या दगाबाजी करणाऱ्या आमदरांवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांनी शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीला दगा देणाऱ्या आमदारांची नावं जाहीरपणे सांगितले. वसई-विरारच्या हितेंद्र ठाकूर यांची तीन मते आम्हाला मिळाली नाहीत. त्यानंतर करमाळ्याचे संजयमामा शिंदे, नांदेडचे श्यामसुंदर शिंगे आणि देवेंद्र भुयार या आमदारांची मते आम्हाला मिळाली नसल्याचे संजय राऊत म्हणाले.

“काही घोड्यांवर जास्त बोली लागली. त्यामुळे बाजारात असलेले घोडे विकले गेले. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जातात. पण विकले जाणारे लोकं कुणाचीच नसतात. साधारण ६ अपक्षांनी आम्हाला धोका दिला. ज्या अपक्ष आमदारांनी शब्द देऊनही मत दिलं नाही. त्यांची यादी आमच्याकडे आहे, असा गर्भित इशारा शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फुटीर आमदारांना दिला.

संख्याबळ असूनही शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांचा पराभव झाल्याने महाविकास आघाडीच्या गोटात खळबळ उडाली आहे. कोणत्या अपक्ष आमदारांनी मविआला शब्द देऊनही धोका दिला, याचा शोध घेतला जातोय. भाजपला जाऊन मिळालेल्या संबंधित आमदारांकडे राऊतांचा रोख होता. दगाबाजी करणारे आमदार कोण आहेत, त्यांची नावं आम्हाला माहिती आहेत. आता पाहुयात, असा गर्भित इशारा संजय राऊत यांनी दिला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here