मुंबई : मराठी कलाकार सिनेमा, मालिकांमध्ये कितीही व्यग्र असले तरी त्यांचं पहिलं प्रेम मराठी नाटकांवर, मराठी रंगभूमीवर असतं. त्यामुळेच त्यांच्या व्यग्र अशा दिनक्रमातून वेळ काढत ते नाटकांचे प्रयोग आवर्जून करत असतात. परंतु सध्याच्या काळात मात्र राज्यातील नाट्यगृहांची जी दयनीय अवस्था झाली आहे, त्यामुळे नाटकात काम करताना कलाकारांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला सामोरं जावं लागतं. अनेकदा तर त्यांना मनस्तापदेखील होतो.

आई तनुजाला घाबरते काजोल, खोटं वाटत असेल तर पाहा हा भन्नाट किस्सा

अशावेळी हे कलाकार त्यांचा हा मनस्ताप, राग, संताप सोशल मीडियावरून व्यक्त करतात. असाच तापदायक अनुभव सही रे सही (Sahi Re Sahi) नाटकाच्या प्रयोगावेळी भरत जाधव (Bharat Jadhav)यांना आला. नाटकाचा प्रयोग सुरू असताना नाट्यगृहातील गैरसोयींमुळे प्रेक्षकांनी गोंधळ घालत तो थांबवला. त्याबाबतचं ट्वीट एका प्रेक्षकानं केलं. त्या प्रेक्षकानं केलेलं ट्वीट भरत जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलं.


काय झालं नेमकं

भरत जाधव सिनेमांबरोबरच नाटकांमध्येही कार्यरत आहे. मराठी रंगभूमीमुळे भरत यांना खरी ओळख मिळाली आहे. त्यामुळे भरत आजही नाटकाचे प्रयोग करतात. त्यात ‘सही रे सही’ हे नाटक ते गेली अनेक वर्ष करत आहेत. प्रेक्षकांना आजही हे नाटक खूप आवडते आणि ते उत्सुकतेनं नाटकाचा प्रयोग बघायला नाट्यगृहात येतात. मात्र नुकताच या नाटकाचा प्रयोग झाला तेव्हा नाटक सुरू असताना प्रेक्षकांनी गोंधळ घालून ते नाटक बंद पाडलं. ज्यामुळे हे झालं त्यासाठी प्रेक्षकांसह अभिनेत्यानंही खंत व्यक्त केली आहे.

भरत जाधव

‘रानबाजार’साठी गुटखा खाण्याचा असा केला सराव, प्राजक्ताचा VIDEO व्हायरल

या संदर्भात एका प्रेक्षकानं केलेलं ट्वीट भरत यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामच्या स्टोरीवर शेअर केलं आहे. हे ट्वीट शेअर करत भरत यांनी ‘नाट्यगृह व्यवस्थपन हा एक पीएचडीचा स्वतंत्र विषय होऊ शकतो’, असं म्हणत खंत व्यक्त केली.


काय आहे ट्वीटमध्ये

भरत जाधव यांच्या एका चाहत्यानं ट्विटमध्ये लिहिलं आहे की, ‘भरत जाधव यांच्या ‘सही रे सही’च्या प्रयोगाला गेलो असताना, हॉलमधले काही पंखे बंद होते. त्यात एसी पूर्णपणे ठप्प होता. आम्ही प्रेक्षक बोंब मारायला लागलो. त्यावेळी नाटक मध्येच थांबवून भरत जाधवांनी महापौरांना फोन करुन जोपर्यंत पंखे नीट करणार नाही, प्रयोग असाच थांबून राहील असं सांगितलं. अक्षरशः नाटक दीड तास थांबलं होतं. त्या दीड तासात भरत जाधव आमच्यासोबत बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही प्रेक्षक अंधारात बसला आहात. इथे आमच्या स्टेजवर चेहऱ्यावर हजार-हजार व्हॅटचे लाईट आहेत. आम्हीसुद्धा घामाने बेजार झालो आहोत. तेव्हा स्टेजवर असणाऱ्यांची खरी दुरावस्था कळाली.’ असं म्हणत या चाहत्यानं नाट्यगृहाची दुरावस्था पुन्हा एकदा समोर आणली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here