आज दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर केले असता कोर्टाने दोन्ही आरोपींना ४ दिवसाची पोलीस कोठली सुनावली आहे. पोलीस आता उर्वरित २ आरोपींचा शोध घेत आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी डाॅ. सई भोरे पाटील, पोलीस निरिक्षक अजिनाथ काशिद यांची मदत आरोपी शोधण्यास कामी आली आहे. २ पथके वेगवेगळ्या ठिकाणी पाठवले व आरोपीच्या मागावर राहिले यामुळे हे २ आरोपी सापडले आहेत.
मयत ज्ञानेश्वर नाना कारंडेंच्या मावस बहिणीसोबत आरोपी रामेश्वर संभाजी खोचरे रा. येवती ता. तुळजापुर याचे प्रेम प्रकरण होते. या प्रेमाला ज्ञानेश्वर कारंडे यांचा विरोध होता. मयत ज्ञानेश्वर कारंडे व आरोपी रामेश्वर खोचरे हे नात्याने सख्खे मावस भाऊ असून जिच्या बरोबर प्रेम प्रकरण होते ती सुध्दा नात्याने मावस बहिण होती. या प्रेम प्रकरणाबाबत मयत ज्ञानेश्वर कारंडे यांनी आरोपीच्या घरच्यांना बोलावून बैठक घेतली व समज दिली की हे नाते समाजात बदनामी करणारे असून यामुळे बदनामी होईल. तसेच मुलीच्या भविष्यासाठी आरोपीच्या नावावरील उस्मानाबाद येथील फ्लॅट मुलीच्या नावे केला होता.
याचा राग मनात धरुन ही हत्या करण्यात आली. याबाबत मयताचा भाऊ भैरुनाथ नाना कारंडे याने रामेश्वर संभाजी खोचरे, संभाजी खोचरे, परमेश्वर खोचरे, अनिता सतिष भोसले रा. येवती यांच्या विरोधात तुळजापुर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती. या प्रकरणाचा तपास पोलीस निरिक्षक आजिनाथ काशिद, सपोनि कांबळे, सपोनि चासकर हे करत असून बाकी आरोपी फरार आहेत.