सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण: पुण्यात पकडलेल्या आरोपीची पंजाब पोलिसांकडून चौकशी
महिमा चौधरी म्हणाली, तिनं संजय दत्तचा आदर्श घेतला आहे. त्यानं मला लढण्याची प्रेरणा दिली. संजय दत्तला २०२० मध्ये फुफ्फुसाचा कॅन्सर असल्याचं कळलं होतं. त्यानं त्यावर उपचार घेतले आणि कॅन्सरमुक्त झाला. खरंतर त्याला चौथ्या स्टेजचा कॅन्सर होता. नंतर संजय दत्तनं केजीएफ २ मध्ये कामही केलं. महिमा आता द सिग्नेचर सिनेमाचं शूटिंग करत आहे.
महिमा म्हणाली, मी संजय दत्तप्रमाणे लढेन

बाॅम्बे टाइम्सशी बोलताना ती म्हणाली, ‘मला खूप आनंद झाला आहे. माझी कहाणीही कोणासाठी तरी प्रेरणा होऊ शकते. मी या कठीण काळात आयुष्याकडून खूप काही शिकले आहे. संजय दत्तही कॅन्सशी लढत होता. सेटवर आपल्या पत्नीसोबत यायचा.मी पण असंच छान जगणार आहे.’
‘कुरुक्षेत्र’ सिनेमातले हे योगायोग

महिमा पुढे म्हणाली, ‘मी, संजय दत्त आणि महेश मांजरेकर आम्ही तिघांनी कुरुक्षेत्र सिनेमात काम केलं आहे. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तिघांनाही एकाच वेळी कॅन्सरशी सामना करावा लागला होता.’ महिमा पुढे म्हणाली, सोनाली बेंद्रे, मनीषा कोइराला, ताहिरा कश्यप आणि मार्टिना नवरातिलोवा यांनी कॅन्सरशी लढाई दिली. तेही मला नेहमीच प्रभावित करतं.
ना कोणत्या सिनेमात ना मालिकेत! तरीही उर्फी जावेदकडे आहे लाखोंची संपत्ती