ठाणे : कल्याण रेल्वे स्थानकावर मेल एक्स्प्रेस, लोकल गाड्या आल्यानंतर प्रवाशांच्या गर्दीत चोरीच्या घटना मध्ये वाढ झाली होती. पोलीस देखील या चोरट्यांच्या मागावर होते. यादरम्यान, कल्याणच्या भोईवाडा परिसरात राहणाऱ्या मिस्बा बागबान या आपला भाऊ आणि नणंदेसमवेत जनशताब्दी एक्स्प्रेसने २ जून रोजी औरंगाबाद येथे जात होत्या. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कल्याण स्थानकात आलेल्या एक्स्प्रेस गाडीत चढताना त्यांनी आपल्या १ लाख ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने असलेला डबा खांद्याच्या पर्समध्ये ठेवला होता. गर्दीचा फायदा घेत पूजा हीने मिस्बा यांच्या पर्समध्ये हात घालून दागिन्याच्या डबा काढून घेतला. मात्र आपली पर्स खेचली जात असल्याचे पाहून मिस्बाने पूजाचा हात पकडून तिला जाब विचारला असता चोराने मिस्बाच्या हाताला झटका देत पळ काढला.

त्यानंतर मिस्बा यांनी बाहेर असलेल्या पतीला आपल्या पर्समधून दागिन्याचा डबा घेऊन आरोपी पळत असल्याचे सांगताच महम्मद याने त्या महिलेला पकडून कल्याण रेल्वे पोलिसात आणले. तिच्या अंगाची झडती घेतली असता तिच्याकडे दागिन्याचा डबा मिळाला नसल्याने पोलिसांनी तिला विश्वासात घेत चौकशी केली असता तिने आपल्या बहिणीकडे दागिन्याचा डबा देत पर्समध्ये आणखी दागिने आहेत का याचा शोध घेत असल्याचं सांगितलं.

पहिला सामना सर्वांनीच पाहिला; पण हा राडा कोणीच पाहिला नसेल, मारामारीचा Video Viral
याप्रकरणी रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करत फरार हिणाचा शोध सुरु आहे. दरम्यान, पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हिना आणि पूजा या दोन बहिणी असून त्या औरंगाबादमधील बिडकीन तालुक्यातील चित्तेगावच्या रहिवासी असून पारधी समाजाच्या आहेत. या दोन बहिणी मागील अनेक दिवसांपासून गर्दीच्या लोकलमध्ये मागील अनेक वर्षापासून एकत्रित चोरी करत होत्या त्यांनी यापूर्वी अशाप्रकारे किती गुन्हे केले आहेत? याचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितलं.

पहिला सामना सर्वांनीच पाहिला; पण हा राडा कोणीच पाहिला नसेल, मारामारीचा Video Viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here