चेन्नई: दाक्षिणात्य सिनेमातील सुपरस्टार नयनताराच्या (Nayanthara) विरोधात लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी कायदेशीर नोटीस जारी करण्यात आली आहे. गुरुवारी ०९ जून रोजी नयनातारा आणि विग्नेश शिवन (Nayanthara Vignesh Shivan Wedding) या जोडीने लग्नगाठ बांधली, शुक्रवारी १० जून रोजी हे कपल तिरुपती बालाजी मंदिरात दर्शनासाठी पोहोचलं होतं. यावेळी नयनतारा हिने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. नववधूच्या रुपातील नयनताराचे बरेच फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एकीकडे अभिनेत्रीवर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना तिरुमाला तिरुपती देवस्थानम (TTD) समितीने मात्र अभिनेत्रीला नोटीस पाठवली आहे.

नयनतारा आणि विग्नेश यांच्या मंदिरात जाण्यामुळे आणि त्याठिकाणी जाऊन आशिर्वाद घेण्याबाबत वाद निर्माण झाला आहे. मंदिर समितीने असा आरोप केला आहे नयनतारा हिने मंदिर परिसरात फोटो काढले याशिवाय तिने पायातील चप्पल देखील काढले नव्हते.

हे वाचा-‘रानबाजार’साठी गुटखा खाण्याचा असा केला सराव, प्राजक्ताचा VIDEO व्हायरल

तिरुमला तिरुपति देवस्‍थानम समितिचे चीफ विजलेन्स सिक्योरिटी अधिकारी नरसिंह किशोर यांनी अभिनेत्रीवर आरोप आरोप केला आहे की ती त्याठिकाणी चप्पल घालूनच फिरत होती. मंदिरात फोटोग्राफी करण्यास मनाई आहे, त्यांनी हा देखील नियम मोडल्याचा आरोप मंदिर समितीने केला आहे. नरसिंह किशोर यांनी असे म्हटले आहे की, ‘नयनतारा या दरम्यान मंदिर परिसरात चप्पल घालून फिरत होती. आमच्या सुरक्षा रक्षकांनी तिला लगेच अडवले. आम्हाला सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यावर लक्षात आले की दोघांनी नियम तोडून फोटोशूट देखील केले आहे.’

Nayanthara at Tirupati

मंदिर परिसरात चप्पल घालून नयनातारा

नयनतारा मागणार माफी?
त्यांनी पुढे अशी माहिती दिली की मंदिर समितीने अभिनेत्रीशी याविषयी बातचीत केली आहे. त्यांनी तिच्याकडे व्हिडिओ मेसेजद्वारे माफी मागण्याची मागणीही केली आहे. नरसिंह किशोर पुढे म्हणाले की, ‘आम्ही नयनताराला नोटीस पाठवत आहोत. आम्ही तिच्याशी फोनवर देखील संपर्क करत आहोत. ती व्हिडिओ मेसेज जारी करून भगवान बालाजी, मंदिर समिती आणि भाविकांची माफी मागायला तयार आहे.’ नयनातारा हिने मुख्य मंदिरात पोहोचल्यावर चपला काढल्याचेही समोर आले आहे.

Nayanthara and Vignesh at Tirupati Balaji Mandir1

नयनतारा आणि विग्नेश

हे वाचा-पुन्हा एकदा विकी-कतरिनाने केलं लग्न, बॉलिवूडकर झाले वऱ्हाडी! पाहा Viral Video

नयनतारा आणि विग्नेश यांचे तिरुपती बालाजी मंदिरातील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये नयनाताराने पिवळ्या रंगाची साडी तर विग्नेशने पांढऱ्या रंगाचा शर्ट-धोती परिधान केले आहे. दोघांचे हे फोटो व्हायरल होण्याआधी लग्नाचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. दाक्षिणात्य सिनेसृष्टीमध्ये झालेल्या या ‘ग्रँड वेडिंग’मध्ये अभिनय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here