पुण्यात भारतीय जनता महिला आघाडीच्या वतीने बुधवार पेठ येथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उपस्थित राहिलेल्या अमृता फडणवीसांनी देहविक्री करणाऱ्या महिलांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे, नियमित तपासणी करावी, योगासने करावीत, असा सल्ला दिला.
आपल्या समाजामध्ये वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना खूप खालच्या पातळीची वागणूक दिली जाते. वेश्या व्यवसायाचा प्रोफेशन म्हणून स्वीकार व्हायला हवा. जर्मनीत या व्यवसायाकडे आदराने पाहिले जाते. मी त्यांच्या पाठीशी आहे, असं अमृता फडणवीस म्हणाल्या. वेश्या व्यवसायामुळे समाजात संतुलन राखलं जातं. या व्यवसायामुळे बलात्कारही कमी प्रमाणात होतात, असं अमृता फडणवीस यांना वाटतं.
हेही वाचा : अमृता फडणवीसांचा ‘कान्स’मध्ये गौरव, प्रेझेन्टेशन देण्याची मिळाली संधी
वेश्या व्यवसायाला सुप्रीम कोर्टानेही पाठिंबा दिला आहे. तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण आली, तर सर्व जण तुमचे रक्षण करण्यासाठी आहोत. तुम्हीही इतरांप्रमाणे या समाजाचा एक भाग आहात. त्यामुळे तुमच्यावर कोणत्याही प्रकारचा वाईट प्रसंग आला तर कधी पण हाक मारा आम्ही सदैव तुमच्या पाठीशी आहोत, अशी हमी अमृता फडणवीस यांनी यावेळी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना दिली.
‘देवेंद्र न कभी अकेला था, न अकेला है’
दुसरीकडे, राज्यात गेल्या दिवसांपासून राज्यसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. या निवडणुकीच्या निकालाचा ड्रामा रात्रभर सुरु होता. अखेर या निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांचा पराभव झाला आणि भाजपच्या धनंजय महाडिक यांनी गुलाल उधळला. भाजपच्या या विजयावर विरोधीपक्ष नेते यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘देवेंद्र न कभी अकेला था, ना अकेला है, उनके साथ पुरी कायनात है’ असं अमृता फडणवीस म्हणाल्या आहेत.
हेही वाचा : अमृता फडणवीसांचा चाहत्यांसाठी खास प्रश्न; अचूक उत्तर द्या आणि….
राज्यसभेत जे निवडून आले आहेत, त्यांचं खूप खूप अभिनंदन. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली आणि अपक्ष आमदाराच्या पाठिंब्यामुळे हा विजय झाला आहे. आजचा हा विजय सत्याचा आहे. आजचा निकाल पाहता सर्वजण सत्याच्या बाजूने आहेत, असं मला वाटत आहे, असं यावेळी अमृता फडणवीस यांनी सांगितलं.