देशभरातील विविध राज्यांमध्ये करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत असून आतापर्यंत देशात एकूण १२, ७५९ जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तर, आतापर्यंत ४२० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज दिवसभरात देशभरात करोनाबाबतची काय स्थिती आहे हे जाणून घेऊ या लाइव्ह अपडेट्सच्या माध्यमातून…
>> दिल्लीत करोना रुग्णांची संख्या १६४० वर पोहोचली.
>> दिल्ली: गेल्या २४ तासांमध्ये दिल्लीत ६२ नवे रुग्ण आढळले.
>> उत्तर प्रदेशात करोनाचे ७८ नवे रुग्ण आढळले, एकूण रुग्णांची संख्या पोहोचली ८०५ वर
>> दिल्लीत ज्या भागात ३ ते ५ रुग्ण आहेत, असे भाग करणार सील
>> नमस्कार, मटा ऑनलाइनच्या या लाइव्ह अपडेट्समध्ये आपले स्वागत. देशभरातील आजची करोनाची परिस्थिती जाणून घेण्यासाठी वाचत राहा
लाइव्ह अपडेट्स…
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times