याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शिवम आणि अवंतिका हे दोघेही उच्च शिक्षित असून हिंजवडी आयटी पार्क येथे इंजिनिअर म्हणून कामाला आहेत. त्यांना तीन वर्षांची मुलगी देखील आहे. आरोपी पती दारू पिऊन घरी उशिरा आल्याने पत्नीने त्याला दारू पिल्याचा जाब विचारला. त्यातून दोघांमध्ये जोराचा वाद झाला. दारूच्या नशेत शिवम याने पत्नी अवंतिका आणि त्याच्या मुलीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
या भांडणात शिवम याने पत्नी अवंतिका हिचा गळा आवळत डोकं भिंतीवर आपटले. त्या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पतीला अटक करण्यात आली असून हिंजवडी पोलीस ठाण्यात पती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हिंजवडी पोलीस करत आहेत.