आता या मालिकेतील कलाकार बाहेर पडत असल्यानं चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपूर्वी शैलेश लोढा बाहेर पडले आहेत. आता या मालिकेतील आणखी एक बातमी समोर आली आहे. आणखी एक कलाकार मालिकेतून बाहेर पडत असल्याची जोरदार चर्चा आहे. हा कलाकार म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ मालिकेत टप्पूची भूमिका साकारणारा अभिनेता राज अनादकट गेल्या दिवसांपासून मालिकेत दिसलेला नाही. यामुळे तो मालिका सोडणार असल्याच्या चर्चा सुरू झाली आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या मालिकेतील अनेक कलाकारांनी याआधीच शो सोडला आहे. गुरचरण सिंग, मोनिका भदौरिया, नेहा मेहता या सर्व कलाकारांनी मालिका आधीच सोडली आहे. दरम्यान, पहिल्यांदा टप्पूची भूमिका भव्य गांधी (Bhavya Gandhi) साकारत होता. परंतु नऊ वर्षानंतर त्यानं ही मालिका सोडली. २००८ ते २०१७ पर्यंत तो प्रेक्षकांचं मनोरंजन करत होता. परंतु तो या मालिकेतून बाहेर पडल्यानंतर ही जबाबदारी राज अनादकट याच्याकडे आली. तेव्हापासून तो आतापर्यंत प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. परंतु आता पाच वर्षांनंतर तो देखील या मालिकेतून बाहेर पडत आहे. आता निर्माते याप्रकरणी या भूमिका घेतात याकडे मालिकेच्या चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.
.