मुंबई : आधीच महागाई वाढत असताना आता पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री बसणार आहे. कारण, सकाळचा ब्रेकफास्ट आता महागण्याची शक्यता आहे. पाच महिन्यांत दुसऱ्यांदा स्लाइस ब्रेडच्या दरात प्रति वडी दोन ते पाच रुपयांनी वाढ झाली आहे. मॉडर्न, ब्रिटानिया आणि विब्स या तीन प्रमुख ब्रँड्सनी गेल्या आठवड्यात अनुक्रमे दर वाढवले आहे.

केंद्र सरकारने चालू वर्षात गव्हासाठी खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) जाहीर न केल्याने मे महिन्यात उद्योगांनी या दरवाढीचा इशारा दिला होता. ही योजना खुल्या बाजारातील पुरवठा आणि किंमती नियंत्रित करते. साधारण ३५०-४०० ग्रॅम पांढऱ्या ब्रेडची किंमत आता ३३ रुपयांवरून ३५ रुपये झाली आहे.

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी; मालमत्ता करात १०-१४ टक्के वाढ?
चारकोप-गोराईचे वितरक सुकुमार नाडर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सँडविच स्टॉल्सवर वापरल्या जाणार्‍या ८०० ग्रॅम विब्स लोफची किंमत ६५ रुपयांवरून ७० रुपयांपर्यंत पोहोचली आहे. मल्टि-ग्रेन ब्रेडचा नियमित लोफ ५५ वरून ६० रुपये झाला आहे, तर ब्राऊन ब्रेडची किंमत ४५ रुपयांवरून ५० रुपये झाली आहे.

खरंतर, नुकतीच जानेवारी २०२२ मध्ये ३-५ रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यामुळे एकापाठोपाठ दोन वाढीमुळे डिसेंबर २०२१ च्या तुलनेत एका पावाची किंमत ५-१० रुपयांनी वाढली आहे.

केंद्राच्या फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (FCI) ने यावर्षी गव्हासाठी खुल्या बाजार विक्री योजना (OMSS) जाहीर न केल्यामुळे ही किंमत मे महिन्यापासूनच अपेक्षित होती. पीठ, ब्रेड आणि बिस्किटं यांसारख्या गव्हावर आधारित उत्पादनांच्या उत्पादकांनी जूनपासून तुटवडा आणि अनेक किंमती वाढण्याचा इशारा दिला होता.

मुंबईत करोनाची चौथी लाट?; तज्ज्ञ म्हणतात…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here