उर्फीला कोण आवडते?
आपल्या अतरंगी कपड्यांमुळे आणि फॅशनमुळे उर्फी जावेद कायम सोशल मीडियावर चर्चेत असते. याशिवाय उर्फी वादग्रस्त विधान करत असल्यानंही चर्चेत असते. आता तिला चर्चेत राहण्यासाठी काही निमित्त सापडलं नाही म्हणून तिनं क्रशबद्दल सांगितलं आणि एका नव्या चर्चेला सुरुवात केली. आता चर्चा सुरू झाली म्हटल्यावर उर्फीचा क्रश कुणी साधासुधा नसणार हे तर नक्कीच… अगदी बरोबर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा उर्फीचा क्रश आहे. उर्फीनं तिच्या इन्स्टा स्टोरीवर किंग खानचा फोटो शेअर करत या गोष्टीचा खुलासा केला आहे.
इन्स्टा स्टोरीमध्ये उर्फी जावेदनं लिहिलं आहे की, ‘खरं तर आर्यन खान माझ्या वयाचा आहे. परंतु त्याचे वडील माझ्यासाठी क्रश आहे.’ उर्फीनं जे सांगितलं त्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली. आता उर्फीची पोस्ट शाहरुख किंवा आर्यननं पाहतील की नाही माहिती नाही परंतु त्यावरून चर्चा तर नक्कीच सुरू झाली आहे…
उर्फीचा बेधडक अंदाज
उर्फी जावेदची खास गोष्ट म्हणजे तिला जे वाटते ते ती बेधडकपणं सांगून मोकळी होते. मग त्यावरून कितीही वादंग उठला तरी त्याला ती घाबरत नाही. उलट तिच्यावर टीका करणाऱ्यांना ती चोख उत्तर देत त्यांचीच बोलती बंद करून टाकते.