हे वाचा-पुन्हा एकदा विकी-कतरिनाने केलं लग्न, बॉलिवूडकर झाले वऱ्हाडी! पाहा Viral Video
फराह खान आणि विकी कौशल सध्या क्रोएशियामध्ये आहेत. विकी कौशलने त्याच्या इन्स्टाग्रामवर काही फोटो देखील पोस्ट केले आहेत. त्यावेळी फराह खान हिने हा फोटो इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये पोस्ट केला आहे. यामध्ये तिने ‘दुसरी कुणीतरी’ स्वत:ला म्हटलं आहे.

काय म्हणाली कतरिना?
कतरिना कैफ हिने विकी कौशलच्या आयुष्यात दुसरं कुणीतरी असण्याला परवानगी दिली आहे. तिने फराहला असे म्हटले आहे की तुला परवानगी आहे. याशिवाय तिने हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत.

विकीने दिलं स्पष्टीकरण
फराह खानच्या या मजेशीर पोस्टवर विकी कौशल याने देखील रिप्लाय दिला आहे. विकीने असं म्हटलं आहे की, ‘आम्ही केवळ चांगले मित्र आहोत.’

हे वाचा-सिद्धू मूसेवाला हत्या प्रकरण: पुण्यात पकडलेल्या आरोपीची पंजाब पोलिसांकडून चौकशी
मिस्टर अँड मिसेस कौशल यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर कतरिना कैफ ‘फोन भूत’, ‘मेरी क्रिसमस’ आणि ‘टायगर ३’ मध्ये दिसणार आहे. तर विकी कौशल ‘डंकी’ शिवाय आनंद तिवारीच्या या एका सिनेमात दिसणार आहे. या सिनेमाचे नाव अद्याप गुलदस्त्यात आहे. विकी कौशलच्या नावावर आणखी दोन चित्रपट आहे, ज्यामध्ये लक्ष्मण उतेकर यांच्या ‘द ग्रेट इंडियन फॅमिली’चा देखील समावेश आहे.