जालना : जालना जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अंगावर वीज कोसळून एका महिलेसह दोन जणांचा दुर्दवी मृत्यू झाला आहे तर दोघे जण गंभीर जखमी झालेत. मृतांमध्ये एका महिलेसह एका २२ वर्षाच्या तरुणाचा आणि एका ४८ वर्षीय व्यक्तीचा ही समावेश आहे.
तिसऱ्या घटनेत मंठा तालुक्यातील माळकीनी गावात ही वसंत वामनराव जाधव या ४८ वर्षीय व्यक्तीच्या अंगावर वीज कोसळून त्यांचा मृत्यू झाला आहे. जाफ्राबाद तालुक्यातील माहोरा गावातील रेणुका देवी मंदिरावर वीज कोसळून मंदिराचा घुमट कोसळला. यामुळे मंदिराचं मोठं नुकसान झालं. मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच जोरदार वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटहून वीज कोसळून दुर्दवी मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.