Weather Alert : राज्यात अतिमुसळधार पावसाचा इशारा, १५ जूनपर्यंत ‘या’ जिल्ह्यांना अलर्ट – weather alert extremely torrential rains in the state alert to till 15 june
मुंबई : राज्यात मुसळधार पावसासह मान्सूनने हजेरी लावल्यामुळे बळीराजा सुखावला असून उकाड्याने हैराण नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे. अशात हवामान खात्याकडून १५ जूनपर्यंत राज्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे शेतीच्या कामांना वेग आला असून नागरिकांनाही हवामानाच अंदाज घेत घराबाहेर पडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून विशेषत: कोकणात पावसाची तीव्रता अधिक असेल अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. मान्सून दाखल होत असतानाच केरळ उत्तर कोकण किनारपट्टीवर ढगांची गर्दी झाली आहे.
मुसळधार पावसाचा कहर! वीज अंगावर कोसळून तिघांचा मृत्यू, दोन जण गंभीर जखमी मुंबईकरांनाही विकेंडसाठी येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. तर १२ जूनला रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना ऑरेंज देण्यात आला असून रायगड सातारा कोल्हापूर या जिल्ह्यांमध्येही पाऊस होईल अशी शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, कोकण, विदर्भ आणि मराठवाडा या जिल्ह्यांमधील काही भागात १३ जूनला पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर १४ जुलैला विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे.
१५ जूनला मात्र पावसाची मोकळीक पाहायला मिळेल मात्र या दिवशी मराठवाड्यातील जिल्ह्यांना हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे.