मुंबई टाइम्स टीम

करोना व्हायरसचा धोका दिवसेंदिवस वाढतोय. त्यामुळे करोनाबाबत जनजागृती करण्यासाठी आणि मदतीचा हात पुढे करण्यासाठी जगभरातल्या काही सौंदर्यवती एकत्र आल्या आहेत. यामध्ये भारताची मानुषी छिल्लर (मिस वर्ल्ड २०१७), प्यूर्टो रिको येथील स्टेफनी डेल वॅले, (मिस वर्ल्ड २०१६) आणि मेक्सिको येथील वॅनेसा पोन्स (मिस वर्ल्ड २०१८) यांचा समावेश आहे.

याबद्दल मानुषी म्हणाली, की ‘आजच्या या संकटकाळात आपल्या देशामध्ये आणि विविध समुदायांमध्ये कोव्हिड -१९ बद्दल जागरुकता वाढवण्याचं काम प्रत्येक जण करू शकतो. काहीही करून व्हायरसचा संसर्ग थांबवला पाहिजे. मला लोकांना सांगायचं आहे की, आम्ही एकत्र आहोत आणि भारतात जे घडत आहे ते उर्वरित जगातही घडत आहे. आपण सर्वांनी सरकारनं घालून दिलेल्या नियमांचं पालन केलं आणि योग्य काळजी घेतली तर या संकटातून नक्की लवकर बाहेर पडू. मी आणि माझी मेक्सिकन आणि प्यूर्टो रिको येथील मैत्रीणी मिळून यावर काम करण्यास सुरुवात केली आहे. आमच्या परीनं आम्ही सर्वतोपरी मदत करण्यासाठी तयार आहोत. आपण सारे एकत्र येऊन लढू आणि ठीक होऊ.’

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here