सिंहगडावर कल्याण दरवाजा परिसरात काही पर्यटकांनी मधमाशांना डिवचलं. त्यामुळे मधमाशांनी पर्यटकांवर हल्ला केला. यामध्ये ७ ते ८ पर्यटक जखमी झाले. त्यांना गडावरून खाली आणण्याचं काम सुरू आहे.

 

honey bees attacked tourist
सिंहगडावर मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला

हायलाइट्स:

  • सिंहगडावरील कल्याण दरवाज्याजवळ पर्यटकांवर मधमाशांचा हल्ला
  • पर्यटकांनी डिवचल्यानं मधमाशांचा पर्यटकांवर हल्ला
  • मधमाशांच्या हल्ल्यात ७ ते ८ पर्यटक जखमी
पुणे: सिंहगडावर आज प्रचंड गर्दी आहे. घाटात चार किलोमीटर पार्किंगची रांग लागली आहे. गडाच्या मागील बाजूस कल्याण दरवाजाजवळ मधमाशांना पर्यटकांनी डिवचले. त्यामुळे मधमाश्यांनी हल्ला केला. यामध्ये सात ते आठ पर्यटक जखमी असल्याचे कळते आहे. त्यांना गडावरून खाली आणण्याचे काम सुरू आहे.

घाटात वाहतूक कोंडी आहे. त्यामुळे त्यांना खाली आणताना गावकर्‍यांची धावपळ होत आहे. उन्हाळ्यातील सुट्टीचा शेवटचा दिवस आणि ढगाळ वातावरणामुळे सकाळी सात वाजल्यापासून पर्यटकांनी घाट रस्त्यावरून गडावर गर्दी केली आहे. मधमाशांना परतवण्यासाठी स्थानिकांनी धूर करून मोहोळ घालवण्याचा प्रयत्न केला.

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : honey bees attacked tourist went to sinhgad fort 7 to 8 tourist injured
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here