सागर: मध्य प्रदेशच्या सागर जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. बहिणीच्या निधनाचा धक्का बसलेल्या चुलत भावानं तिच्या चितेवर उडी घेत आत्महत्या केली. पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.

बहोरिया पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या मझगवामध्ये हा प्रकार घडला. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारच्या संध्याकाळपासून ज्योती उर्फ प्रिती डांगी बेपत्ता झाली. शुक्रवारी सकाळी तिचा मृतदेह विहिरीत सापडला. पंचनामा आणि शवविच्छेदनानंतर त्याच संध्याकाळी ६ वाजता प्रितीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुसऱ्या दिवशी म्हणजेच शनिवारी ज्योतीचे काका उदयसिंह यांचा मुलगा करण डांगी (२१ वर्ष) धार जिल्ह्यातून सागर येथील मझगवाला दुचाकीनं पोहोचला. दुचाकी रस्त्याच्या कडेला उभी करून त्यानं थेट स्मशान घाट गाठलं. तिथे प्रितीची चिता जळत होती. त्या चितेला नमस्कार करून करण चितेवर झोपला. ग्रामस्थांनी याची माहिती त्याच्या कुटुंबीयांना दिली.
‘तू भांडण सोडवणारा कोण?’, मित्राचं भांडण सोडवायला गेलेल्या तरुणावर खंजीरने वार
कुटुंबीय, नातेवाईक स्मशानात पोहोचले. तोपर्यंत त्याचा देह पूर्णपणे जळून गेला होता. त्याला तातडीनं रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र रस्त्यातच त्यानं अखेरचा श्वास घेतला. रविवारी सकाळी ज्योतीच्या चितेजवळ करणवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बहिणीच्या चितेवर उडी घेतल्यानं करण गंभीररित्या भाजल्याचं मझगवाचे सरपंच भरत सिंह घोसी यांनी सांगितलं.
संजय पवारांच्या पराभवानंतर संजय राऊत अडचणीत; निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल होणार?
प्रितीचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला. त्याचा पंचनामा करून तो तिच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. गावातच तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले. दुसऱ्या दिवशी तिचा भाऊ स्मशानात पोहोचला. त्यानं पेटत्या चितेवर उडी घेतली. त्यात तो गंभीर झाला. या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू आहे, असं बहरिया पोलीस ठाण्याचे प्रभारी दिव्य प्रकाश त्रिपाठी यांनी सांगितलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here