सहरसा : महाराष्ट्राचे सुपुत्र शिवदीप लांडे बिहार केडरचे पोलीस अधिकारी आहेत. शिवदीप लांडे महाराष्ट्रातील प्रतिनियुक्तीचा कार्यकाळ संपवून बिहार केडरमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. शिवदीप लांडे सध्या कोसीचे डीआयजी आहेत. शिवदीप लांडे हे त्यांच्या आक्रमक स्वभावासाठी देखील प्रसिद्ध आहेत. अनेक गुन्हेगार त्यांचं नाव ऐकताच थर थर कापतात. सहरसामध्ये पोलीस स्टेशनच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवदीप लांडे यांचा दिलदारपणा दिसून आला.

शिवदीप लांडे सहरसा मध्ये एका पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्यासाठी आले होते. त्यावेळी सहरसाच्या पोलीस अधीक्षक लिपी सिंह या देखील होत्या. पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याची वेळ आली तेव्हा शिवदीप लांडे यांच्या कृतीमुळं सर्व जण भारावले.

Shivdeep Lande  kosi  dig

मोहम्मद कबीर आलम यांना पोलीस स्टेशनच्या कोनशिला अनावरणाचा मान देण्यात आला

शिवदीप लांडे यांनी पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान महिला कॉन्स्टेबल आणि ज्येष्ठ हवालदारांना दिला. पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी आणि चौकीदार मोहम्मद कबीर आलम यांच्या हस्ते पोलीस स्टेशनचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेतला. हे सर्व पाहून उपस्थित इतर पोलीस भारावले. उद्घाटनाचा मान आपल्या खात्यातील सामान्य कर्मचाऱ्यांना दिल्यानं पोलीस कर्मचारी भारावून गेले होते. डीआयजी शिवदीप लांडे यांनी दिलेला सन्मान आजपर्यंत इतर कुणी दिला नव्हता, अशा भावना पोलिसांनी व्यक्त केल्या. शिवदीप लांडे मोठ्या मनाचे आहेत, असं पोलीस कर्मचारी म्हणाले.
उमेदवारी नाकारल्याचा राग, पंकजांच्या चाहत्याचा केंद्रीय मंत्र्यांच्या ऑफिसवर हल्ल्याचा प्रयत्न

बबिता कुमारी आणि मोहम्मद कबीर आलम भावुक

पोलीस स्टेशनच्या उद्घाटनाचा मान मिळेल अस कधीचं वाटलं नव्हतं, असं पोलीस कॉन्स्टेबल बबिता कुमारी म्हणाल्या. डीआयजी साहेबांचे आभार मानते, हे एका स्वप्नापेक्षाही कमी नाही, असंही त्यांनी म्हटलं. मोहम्मद कबीर आलम देखील भावुक झाल्याचं पाहायला मिळालं. डीआयजी लांडे साहेब आणि एसपी लिपि सिंह यांनी मला मान दिला ही मोठी गोष्ट असल्याचे हवालदार आलम म्हणाले.

कार्यकर्त्यांनो १४ तारखेला भेटायला येऊ नका, जिथे आहात तिथूनच शुभेच्छा द्या : राज ठाकरे

शिवदीप लांडे पाच वर्षांचा महाराष्ट्रातील प्रतिनियु्क्तीचा कार्यकाळ संपवून बिहार केडरमध्ये पुन्हा रुजू झाले आहेत. सध्या ते कोसीचे डीआयजी आहेत. यापूर्वी त्यांनी मुंगेर, सहरसा, रोहतास, पाटणामध्ये पोलीस अधीक्षक म्हणून काम केलं आहे. २००६ मध्ये शिवदीप लांडे बिहार केडरमध्ये रुजू झाले होते.

राऊतांनी आरोप केलेल्या आमदाराला शरद पवार म्हणाले, तुझ्याबाबत आम्हाला अजिबात शंका नाही! 92161039

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here