पुणे : सिद्धू मुसेवाला हत्याकांडातील संशयित शार्पशूटर संतोष जाधवच्या पुणे ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. पुणे पोलिसांनी संतोषला गुजरातमधून अटक केली आहे. संतोष जाधवसह नवनाथ सुर्यवंशीलाही पोलिसांनी अटक केली आहे. संतोषला २०२१ मध्ये मंचर येथील बाणखेले खून प्रकरणात अटक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. संतोष जाधवला रविवारी रात्री उशिरा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर हजर करण्यात आले असता २० जूनपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आली आहे. (sharpshooter Santosh Jadhav arrested in Sidhu Moosewala case by Pune Police)

दोन वर्षापासून खून केल्यानंतर संतोष जाधव आणि सौरभ महाकाळ फरार झाले होते. हे दोघंही पंजाबमध्ये राहत असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. हे दोघे ही लॉरेन्स बिष्णोईच्या टोळीमधील असल्याची माहिती समोर आली आहे. पुणे ग्रामीण पोलिसांनी पंजाब पोलिसांना सीसीटीव्ही पाहून संतोष जाधवची माहिती सांगितली होती.
Moose Wala Murder: बाबा गेल्यावर वाईट संगतीने वाया गेला, संतोषच्या आईचा कंठ दाटला
गायक सिद्धू मुसेवाला याच्यावर हल्ला करण्याकरता सचिन बिश्नोई गँगने महाराष्ट्रातून दोन शार्प शूटर बोलावले होते. संतोष जाधव आणि महाकाल नावाचे हे दोन शूटर होते. ज्यांनी मुसेवालावर गोळीबार केला, यांची नावे पंजाब पोलिसांनी जाहीर केली. मुसेवालांची हत्या करण्यासाठी एकूण चार राज्यातून शूटर्स पंजाबमध्ये पाठवण्यात आले होते. ३ शूटर्स पंजाबमधील होते. २ महाराष्ट्रातले, २ हरियाणातले आणि यामधील एक शार्पशूटर हा राजस्थानमधील होता.संतोष जाधवच्या अटकेमुळे मुसेवाला प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पुण्यात पंजाब पोलिसांकडून सिद्धू मुसेवाला प्रकरणाची चौकशी; धक्कादायक माहिती उघड होणार?
संतोष जाधव कोण आहे?

* संतोष जाधव हा २३ वर्षांचा आहे. तो मूळचा आंबेगाव तालुक्याच्या आदिवासी भागातील पोखरी गावचा आहे. त्याचं मंचरमध्ये वास्तव्य होतं.

*त्याच्या कुटुंबात आई, बहीण, पत्नी आणि एक मुलगी आहे.

*मंचर पोलीस स्टेशन हद्दीत राण्या उर्फ ओमकार बानखीले यांचा १ ऑगस्ट २०२१ रोजी खून करण्यात आला होता. संतोष जाधव या खुनात सहभागी असल्याचा गुन्हा दाखल आहे.

*त्याशिवाय, मंचर पोलीस त्याच्यावर ठाण्यात एक खंडणीचा, चोरीचा गुन्हा देखील दाखल आहे.

*राण्या बानखीले खुनाच्या गुन्ह्यात त्याच्यावर मोक्का देखील लावण्यात आला असून तो फरार आहे. या प्रकरणात त्याला तडीपार करण्यात आले होते.

*त्यानंतर त्याचे राजस्थान, पंजाब, हरियाणा या भागात वास्तव्य होते. येथेही त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here