‘राज्यसभा तो झांकी है….’
राज्यात नुकतीच राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीत सहावी जागा जिंकण्यासाठी कोणाकडेच हक्काची पुरेशी मते नव्हती. निवडणुकीआधी तर महाविकास आघाडीचा उमेदवार मजबूत स्थितीत दिसत होता. मात्र पडद्याआडून भाजपने वेगवान हालचाली करत अपक्ष आमदार आणि इतर छोट्या पक्षांच्या आमदारांना आपल्याकडे खेचलं आणि सहाव्या जागेवर विजय मिळवत महाविकास आघाडीला धक्का दिला. मात्र राज्यसभा तो झांकी, विधानपरिषद अभी बाकी है, असं म्हणत चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीला इशारा दिला आहे.
विधानपरिषद निवडणुकीत गुप्त मतदान असल्याने अनेक जण सद्सद्विवेकबुद्धीने भाजपला मतदान करतील, असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमक्या काय घडामोडी घडतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.