Vidhan Parishad Election 2022 | शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवासाठी अपक्षांची नाराजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आता शरद पवार यांनीच पुढाकार घेत अपक्षांची नाराजी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अपक्ष आमदारांना एकत्र बसवून त्यांची नाराजी दूर करा, अशा सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना दिल्याची माहिती आहे.

उद्धव ठाकरे आणि शरद पवार
हायलाइट्स:
- २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे
- अपक्ष आमदारांना एकत्र बसवून त्यांची नाराजी दूर करा
- देवेंद्र भुयारांनी घेतली अजित पवारांची भेट
यावेळी शरद पवार यांनी राज्यसभा निवडणुकीत मविआची मते फुटल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. आता विधानपरिषद आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत काळजी घ्यावी, अशा सूचना शरद पवार यांनी आमदारांना दिल्या आहेत. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेच्या संजय पवार यांच्या पराभवासाठी अपक्षांची नाराजी कारणीभूत ठरली होती. त्यामुळे आता शरद पवार यांनीच पुढाकार घेत अपक्षांची नाराजी दूर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. येत्या २० जूनला विधानपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वी अपक्ष आमदारांना एकत्र बसवून त्यांची नाराजी दूर करा, अशा सूचना शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि बाळासाहेब थोरात यांना दिल्याची माहिती आहे.
देवेंद्र भुयारांची भूमिका प्रामाणिक वाटली, याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलेन: संजय राऊत
राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेशी दगाबाजी करणाऱ्या नेत्यांमध्ये संजय राऊत यांनी देवेंद्र भुयार यांचे नाव घेतले होते. या पार्श्वभूमीवर देवेंद्र भुयार यांनी राऊत यांची भेट घेऊन आपली बाजू मांडली होती. त्यानंतर संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला होता. तेव्हा राऊत यांनी म्हटले की, देवेंद्र भुयार यांनी माझ्यासमोर त्यांचे म्हणणे मांडले. मला ते प्रामाणिकपणे बोलत होते, असे वाटले. देवेंद्र भुयार यांनी बोलून दाखवलेल्या भावना खऱ्या आहेत. या भावना मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहोचवेन, असेही संजय राऊत यांनी सांगितले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
Web Title : ncp leader sharad pawar meeting with party leaders strategy for vidhan parishad election 2022
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Marathi News from Maharashtra Times, TIL Network