मुंबई: छोट्या पडद्यावरच्या ‘देवमाणूस’ या मालिकेनं पहिल्या पर्वापासूनच प्रेक्षकांना खिळवून ठेवलं. या मालिकेतील देवमाणूस म्हणजेच अभिनेता किरण गायकवाड पहिल्या पर्वात डॉक्टर अजितकुमार तर दुसऱ्या पर्वात नटवर सिंगच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आला. तो ही भूमिका अगदी चोख बजावतोय. सध्या मालिकेचं कथानक हे एका रंजक वळणावर आलं आहे. मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे.
हे जरा अतीच झालं! ‘देवमाणूस’ मालिकेवर प्रेक्षक पुन्हा भडकले
मार्तंड जामकर या पोलिस अधिकाऱ्यानं नटवर सिंगला अटक केली होती. पण पुन्हा एकदा त्याची निर्दोष सुटका झाली आहे. मालिकेत आता मोठा ट्विस्ट येणार आहे. नटवरचं पुढं काय होणार याची चर्चा सुरू असतानाच डिंपल आता गरोदर असल्याचं मालिकेत दाखण्यात येणार आहे. याचा प्रोमो नुकताच शेअर करण्यात आला आहे. त्यामुळं ही मालिका आता संपणार असल्याच्या चर्चा ही सुरू झाल्या आहेत. जुन्या एका प्रोमोमध्ये डिंपल स्वत: डॉक्टरला संपवते, असंही दाखवण्यात आलं होतं. त्यामुळं ही वेळ आली आहे का? अशा चर्चा देखील सोशल मीडियावर सुरू आहेत.

या प्रोमोमध्ये डिंपलला कोरड्या उलट्या होत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. डिंपल खरंच गरोदर असणार की, मालिकेत यापेक्षा वेगळा ट्विस्ट पाहायला मिळणार हे पाहणं उत्सुकतेच ठरणार आहे.

प्रेक्षक भडकले
देवमाणूस मालिकेतील कलाकारांचीही प्रचंड चर्चा सुरू असते. काही दिवसांपूर्वी मालिकेत चिनू नावाच्या एका लहान मुलीचं एंन्ट्री झाली होती. मालिकेतील चिनू प्रेक्षकांना देखील आवडली होती. परंतु तिचा मृत्यू दाखवल्यानं प्रेक्षकांनी नाराजी दर्शवली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here