मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडून आता विधानपरिषद निवडणुकीत मतदान करता यावे, यासाठी मुंबई हायकोर्टात प्रयत्न करण्यात येत आहेत. राज्यसभा निवडणुकीत या दोघांनाही मतदान करता आले नव्हते. या पार्श्वभूमीवर विधानपरिषद निवडणुकीतही पदरी निराशा पडू नये म्हणून मलिक आणि देशमुख यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

विधानपरिषद निवडणुकीतील मतदानाबाबत नवाब मलिक यांच्या याचिकेवर आज दुपारी २.३० वाजता सुनावणी होण्याची शक्यता, तर अनिल देशमुख यांच्या याचिकेवर बुधवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीदरम्यान मलिक आणि देशमुख यांना न्यायालयाकडून दिलासा मिळतो की नाही, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

राज्यसभा निवडणुकीत मतं फुटल्याने शरद पवार नाराज, अपक्षांची नाराजी तातडीने दूर करण्याच्या सूचना

दरम्यान, २० जून रोजी विधानपरिषदेच्या १० जागांसाठी मतदान होणार आहे. या १० जागांसाठी १२ उमेदवार मैदानात उतरल्याने चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here