राज्यसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयाबद्दल मी देवेंद्र फडणवीस यांचे अभिनंदन करायला गेलो होतो. देवेंद्र फडणवीस हे आधुनिक युगातील चाणक्य आहेत. देवेंद्र फडणवीस जे बोलतील ते मी करेन. विधानपरिषेचा अर्ज माघारी घेण्यासाठी आणखी दीड तास शिल्लक आहेत. यादरम्यान काही घडामोडी घडतात का, हे पाहावे लागेल. परंतु, सहावी जागा लढायची की नाही, याबाबत अंतिम निर्णय फडणवीस हेच घेतील, असे सदाभाऊ खोत यांनी स्पष्ट केले.
मी निवडणुकीचा अर्ज हा लढण्यासाठीच भरला आहे. पण पक्षाकडून होणारा निर्णय आमच्या सगळ्यांवर बंधनकारक आहे. विधान परिषद निवडणुकीत गुप्त पद्धतीने मतदान होईल. ग्रामीण भागातील अनेक आमदार नाराज आहेत. ही नाराजी विधान परिषद निवडणुकीच्या मतदानाच्यानिमित्ताने दिसून येईल, असा दावा सदाभाऊ खोत यांनी केला.
‘ठाकरे सरकार अल्पमतात येईल इतकी मतं आमच्याकडे आहेत’
भाजपने आपले ५ उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. तर, सदाभाऊ खोत हे भाजप पुरस्कृत उमेदवार म्हणून निवडणूक लढत आहेत. या सहाही जागा भाजप जिंकेल, सरकार अल्पमतात येईल इतकी मतं भाजपकडे असल्याचा दावा प्रसाद लाड यांनी केला आहे. प्रसाद लाड यांनी सोमवारी मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सदाभाऊ खोतांचा अपक्ष अर्ज असला तरी तो भाजप पुरस्कृत आहे. राज्यसभेच्या निवडणुकांच्या निकालानंतर आमदारांमध्ये असलेली अस्वस्थता, सर्व अपक्ष आणि छोट्या पक्षाचा फडणवीसांवरचा असलेला विश्वास निश्चितपणे या सरकारला अल्पमतात आणण्याइतकं मतदान भाजप आणि पुरस्कृत उमेदवाराला मिळेल, असे प्रसाद लाड यांनी म्हटले.
आमच्या हातात ईडी असती तर आम्हालाही मतं मिळाली असती | संजय राऊत