मुंबई: ‘असंच काहीसं घडलं होतं… कदाचित?!’ असं म्हणतं मनोरंजन विश्वात वादळ आणू पाहणाऱ्या ‘रानबाजार’ या वेब सीरिजची सध्या प्रचंड चर्चा सुरू आहे. या सीरिजमधील कलाकारांचही प्रचंड कौतुक होत आहे. अभिनेता कुशल बद्रिके यानं यासंदर्भात एक पोस्ट शेअर केली होती.

कुशलनं रानबाजारच्या टीमचं कौतुक करण्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली होती. पण एका वेगळ्याच कारणामुळं त्याची ही पोस्ट चर्चेत आली. कुशलनं रानबाजारमधील सर्व कलाकारांचं कौतुक करत असताना प्राजक्ता माळीचा उल्लेख केला नव्हता. अर्थात त्याच्याकडून चुकून प्राजक्ताचं नाव लिहायचं राहिलं होतं. पण नेमकी हिच चूक नेटकऱ्यांनी पकडली अन् एकचं चर्चा सुरू झाली.

कुशलनंही या सोशल मीडियावरील चर्चेला हवा न देता, एक खास पोस्ट शेअर करत प्राजक्ताला सॉरी म्हटलं आहे. त्यानं शेअर केलेली ही मजेशीर पोस्ट चांगलीच चर्चेत आलीय.
माझ्या दिसण्यावरुन मला शोमधून काढलं, अभिनेत्रीनं सांगितला मराठी सिनेसृष्टीतील धक्कादायक अनुभव
काय आहे कुशलची पोस्ट?
मी समस्त न्यूज मीडिया आणि विशेष प्राजक्ता माळीचे चाहते यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायचं चुकून राहिलं. प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीण सुद्धा आहे. तुमच्या या बातमीमुळे आता ती बहुतेक ‘दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटण, तेल वगैरे गिफ्ट म्हणून पाठवते ते पाठवणार नाही’ तुम्हाला त्याचं पाप लागेल. आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तू मस्त काम केलस यार . तुला सॉरी म्हणतो.

कुशल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here